Ticker

6/recent/ticker-posts

अबब! अंतराळात पर्यटन



नवी दिल्ली | आपण जी स्वप्न बघतो, त्यातील प्रत्येक स्वप्न पूर्ण होईलच असे नाही. पण काही जण ती पूर्ण करण्यासाठी धरती आकाश एक करत प्रयत्न करतांना दिसून येतात. असंच काहीसं अमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांच्या बाबतीत झाले आहेत. 


त्यांनी बघितलेल्या स्वप्नाप्रमाणे ते त्यांची कंपनी ब्लू ओरिजनच्या न्यू कॅप्सूल मधून चक्क 11 मिनिटासाठी अंतराळाच्या प्रवासासाठी जाणार आहेत.


येणा-या 20 जुलै रोजी ते अंतराळ प्रवासासाठी जाणार आहे. या प्रवासात त्यांचे भाऊ मार्क बेझोस हे देखील त्यांच्या सोबत जाणार आहे. 


मी वयाच्या 5 व्या वर्षांपासून अंतराळ प्रवास करण्याचे स्वप्न बघत आलो आहे, असं त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे. लहानपणापासून पाहिलेल्या या स्वप्नाचा पाठलाग करत असतांना, जेफ बेझोस यांनी सन 2000 मध्ये ब्लू ओरिजीन नावाच्या एरोस्पेस कंपनीची सुरुवात केली. 


या कंपनीच्या माध्यमातून अंतराळात एक कॉलनी निर्माण करण्याचे बेझोस यांचे स्वप्न आहे. 1982 मध्ये जेफ हे प्रिन्सटन विद्यापीठात शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या वर्गात प्रथम स्थान पटकावले होते. 


तल्लख बुध्दीमत्ता असलेल्या जेफ यांनी त्यांच्या पदवी शिक्षणाच्या वेळी केलेल्या भाषणादरम्यान त्यांच्या स्पेस ड्रीमबद्दल सांगितले होते. जेफ हे 680 विद्यार्थ्यांमधून पहिले आले होते. 


अंतराळ पर्यटनाचे स्वप्न पाहण्यामागचा जेफ यांचा हेतू हा पृथ्वीला वाचवणे हा होता. त्यांची इच्छा पृथ्वीचे ग्लोबल वॉर्मिंग पासून संरक्षण करण्याची आहे, यासाठी त्यांनी बेझोस अर्थ फंड नावाची संस्था देखील बनवली आहे. 


येत्या 20 जुलै रोजी ते हा अंतराळाच्या प्रवास करणार असून त्यांचा हा प्रवास 11 मिनिटाचा असणार आहे.

Post a Comment

0 Comments