सांगली | ही घटना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात घडली. जीथे चोरीचा बनाव करत पोलिसात तक्रार दाखल करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.
शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे अंबिका स्टील नावाच्या दुकान मालकाने आपल्या दुकानात 17 लाख 70 हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती.
चोरी झालेली रक्कम ही मोठी असल्याने, पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत कसून तपास करण्यास सुरुवात केली. केल्या गेलेल्या तपासात, तक्रार देणारी व्यक्तीच चोर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
या घडलेल्या प्रकारामुळे पोलिस देखील चांगलेच हैरान झाले. घडलेल्या घटनेनुसार, शेडगेवाडी येथील अंबिका स्टील या दुकानाचे मालक जयंतीलाल रामलाल ओसवाल हे गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या छोट्या भावासह व कुटुंबीयांसह शेडगेवाडी येथे राहतात.
आपल्या लहान भावाला स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी कुटुंबीयांनी 17 लाख रुपये एकमताने देण्याचे ठरवले. परंतू जयंतीलाल यांचा मात्र याला विरोध होता.
त्यामुळे त्यांनी कुटुंबीयांना थेट विरोध न करता एक कट रचला व त्यामध्ये शेवटी ते स्वतःच अडकले. कुटुंबियांसमोर लहान भावाला 17 लाख रुपये देतो, असं मान्य करून संपूर्ण रक्कम दुकानात ठेवली आणि जयंतीलाल हे कुटुंबीयांना घेऊन हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले.
कुटुंबीयांसोबत हॉटेलमध्ये जेवण करत असतांना त्यांनी आपल्या दुकानात काल्पनिक चोरी घडवून आणली. त्यानंतर आपल्या दुकानात 17 लाख 70 हजार रुपयांची चोरी झाल्याचा बनाव करत, पोलिसांत तक्रार देखील दाखल केली.
पोलिसांनी श्वानपथकाला बोलावून तपास सुरु केला असता, श्वान एकाच जागेवर सारखे फिरत होते. यादरम्यान पोलिसांना तक्रारदार जयंतीलाल याच्यावर संशय आल्याने त्यांनी त्यांचीच कसून चौकशी केली.
दरम्यान आपणचं हा कट रचल्याचे त्यांनी पोलिसांनी सांगितले. चोरलेली रक्कम ही सांगली येथे आपल्या मित्राच्या घरी ठेवली असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. .
0 Comments