Ticker

6/recent/ticker-posts

या लसीच्या निर्मितीला भारतात परवानगी; DGCI कडून मिळाली अधिकृत मान्यता

From Pixabay


मुंबई | कोरोनाच्या नव्या प्रकारांमुळे आधीच चिंता निर्माण झाली आहे. अशातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत, देशभरात लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. यापूर्वी भारतात फक्त कोवाॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोनच लसीच्या वितरणाला परवानगी देण्यात आली होती. 


त्यानंतर रशियाच्या स्पुटनिक वी या लसीच्या वितरणासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र या लसीची निर्मिती भारतात होण्याची परवानगी मिळाली नव्हती. आता ही लस भारतातच तयार होणार असल्याने, देशाची चिंता काही प्रमाणात दूर झाली आहे.


पॅनेशिया या कंपनीकडून स्पुटनिक-वी लसीची भारतात निर्मिती केल्या जाणार आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून बायोटेक्नाॅलॉजी कंपनी पॅनेशिया बायोटेकला रशियाच्या स्पुटनिक-वी लसीची भारतात निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.


रशियाने कोरोना लसीबाबत सहा कंपन्यांसोबत करार केले आहेत. त्यात पॅनेशिया बायोटेक कंपनीचा देखील समावेश आहे.


देशात स्पुटनिक वी लसीचे भारतातील वितरण हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याकडून करण्यात येत होते. या लसीचा एक डोस 1142 रुपयांना खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध केल्या जातो. 


परंतू आता ही लस भारतात तयार होणार असल्याने लसीच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. स्पुटनिक वी लस कोरोनाविरुद्ध तब्बल 92 टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments