Ticker

6/recent/ticker-posts

आजवर कोरोना झाला नसलेल्यांना तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

From Pixabay


नवी दिल्ली | कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे अनेक कुटूंबे उध्वस्त झालीत. आता कुठे कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. 


अशातच तज्ज्ञांनी, ज्या लोकांना आजवर कोरोना नाही झाला, त्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांच्यानुसार, ज्यांना अद्याप कोरोना झालेला नाही, त्यांनी कमीत कमी एक डोस तरी द्यावा, असे मत व्यक्त केले आहे.


दिल्लीमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पण येणा-या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, ज्या लोकांना आजवर कोरोना झालेला नाही, त्यांनी या काळात कोरोना लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.


पुण्यात करण्यात आलेल्या सीरो सर्ह्वेमध्ये ८० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह होऊन गेल्याचे दिसले आहे. अशीच परिस्थिती दिल्लीत देखील आहे, असं मत सफदरजंग हॉस्पिटलचे कम्युनिटी मेडिसिनचे एचओडी डॉ. जुगल यांनी व्यक्त केले आहे. 


यापैकी 10 ते 20 टक्के लोकसंख्या अशी आहे, की ज्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. अशा लोकांना सर्वात आधी कोरोना लस देण्यात यावी, असं डॉक्टरांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments