Ticker

6/recent/ticker-posts

बाॅलिवूडमधील पून्हा एक तारा मावळला

हाॅरर चित्रपटांचे निर्माते कुमार रामसे यांचे निधन


From Facebook


मुंबई | बाॅलीवूडमधील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने आधीच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अशातच आणखी एका निर्मात्याच्या जाण्याने बाॅलीवूडला धक्का बसला आहे. 


दिलीप कुमार यांच्या जाण्याच्या धक्क्यामधून अजूनही लोक सावरू शकले नाहीत, तोच हॉरर चित्रपटांचे बादशाह मानल्या जाणा-या रामसे बंधुंपैकी कुमार रामसे यांचे निधन झाले आहे.


हृदयविकाराच्या झटक्याने कुमार रामसे यांचे निधन झाले. वयाच्या 85 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कलासृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. 


त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत वेगळीच शांतता पसरली आहे. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


कुमार रामसे यांच्या मागे त्यांच्या पत्नी आणि राज, गोपाल व सुनील अशी तीन मुले आहेत. आपल्या सात भावंडामध्ये कुमार हे सर्वात मोठे होते. रामसे बंधूंमध्ये कुमार यांच्यासह केशु, तुलसी, करण, श्याम, गंगू आणि अर्जुन यांचा समावेश आहे. 


चित्रपटसृष्टीतील कुमार रामसे हे पहिले निर्माते होते, ज्यांनी हाॅरर चित्रपटांकडे सर्वांचे लक्ष वेधले. बाॅलीवूडमध्ये रोमँटिक चित्रपटाचा काळ असतांना रामसे बंधुंच्या हॉरर चित्रपटांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. 


राना मंदिर, साया, खोज अशा कितीतरी हॉरर चित्रपटांची निर्मिती या ब्रदर्सने केली.

Post a Comment

0 Comments