Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनामुळे पालक गमावलेल्या 100 मुलांना या तरूणाने दिला आधार

From Facebook


देहरादून | देशात कोरोनाने सर्वत्र कहर घातला असतांना अनेक कुटूंबावर कोरोनाने काळाची झडप घातली. यात अनेक लहान मुलांनी आपल्या पालकांना गमावले. 


अशा मुलांचे भविष्य उज्वल व्हावे, यासाठी सरकार देखील प्रयत्नरत आहे. परंतू या मुलांना मायेचा आसरा मिळावा, त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे या हेतूने अनेक सामाजिक संस्था देखील पुढे येत आहे.


आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेत, अशाच एका तरूणाने कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांना जवळ घेतले आहे. जय शर्मा असं या देहरादूनमधील तरूणाचे नाव आहे. 


कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 100 चिमुकल्यांचे पालकत्व या तरूणाने स्वीकारले आहे. ‘जस्ट ओपन युवरसेल्फ’ या सामाजिक संस्थेचा जय शर्मा संस्थापक आहे.


जय शर्मा चालवत असलेल्या या सामाजिक संस्थेकडून कोरोना काळात आजवर अनेक कुटूंबाना विविध माध्यमांतून मदत करण्यात आली आहे. यात मोफत ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देणे, कोविड मेडिकल कीट, सॅनिटायझेशन किट्स आणि इतर वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करुन देणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.


जय शर्मा याने आपल्या संस्थेच्या फेसबुक पेजवर कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या एकूण 100 मुलांचे पालकत्व स्वीकारणार असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करण्याआधीच जय ने 20 मुलांचे पालकत्व याआधीच स्वीकारले आहे. त्याने घेतलेल्या या नव्या निर्णयाचे देशात सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments