Ticker

6/recent/ticker-posts

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे निधन!

From Facebook


शिमला | काँग्रेस नेते आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे गुरुवारी पहाटे निधन वयाच्या 87 व्या वर्षी दुःखद निधन झाले. शिमला मधील इंदिरा गांधी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 


प्रकृती चिंताजनक असल्याने गेल्या दोन दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज पहाटे वीरभद्र सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. 


काही दिवसांपूर्वी त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. मात्र कोरोनामुक्त झाल्यानंतर वीरभद्र सिंह यांना घरी येण्यासाठी सुट्टी मिळाली होती. मात्र त्यांची तब्येत पुन्हा खालावल्याने त्यांना आयजीएमसीमध्ये दाखल करण्यात आले होते.


आपल्या राजकीय कारकिर्दीत ते नऊ वेळा आमदार आणि पाच वेळा खासदार होते. महत्वाचं म्हणजे, वीरभद्र सिंह हे सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 


त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटूंबावर आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी प्रतिभा सिंह, मुलगा आणि शिमला ग्रामीणचे आमदार विक्रमादित्य सिंह आणि मुलगी अपराजिता सिंह असा मोठा परिवार आहे.


त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते, केंद्रीय मंत्री, पर्यटन व नागरी उड्डाण, उद्योग राज्यमंत्री, केंद्रीय पोलाद मंत्री आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री म्हणून देखील काम पाहिले होते.

Post a Comment

0 Comments