Ticker

6/recent/ticker-posts

या कारणामुळे होऊ शकतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घट, वाचा सविस्तर...

From Pixabay


नवी दिल्ली | कोरोनामुळे सर्वांचे अर्थचक्र बिघडलेले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. 


असे असतांनाही मे महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती मात्र झपाट्याने वाढतांना दिसून येत आहे. ही वाढ अजूनही सुरूच आहे.


त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला दररोज कात्री बसत आहे. अशातच आता पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीत घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 


तेल विपनन कंपन्यांकडून जागतिक तेलाच्या किंमतीत अस्थिरतेचे विश्लेषन केले जात असल्याने आज पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमती बदलल्या नाहीत. तसेच ओएमसीने पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमतीत कपात करण्यास सुरुवात केली आहे. 


यामुळे लवकरंच देशांतर्गत इंधनांच्या किंमती खाली येवू शकतात, असे बोलले जात आहे.


मे महिन्यापासून आजवर एकूण ३६ वेळा पेट्रोलच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 34 वेळा वाढ झाली आहे. 


या वाढीमुळे इंधनाची किंमत आता देशातील बहुतेक पेट्रोल पंपांवर नव्या विक्रमावर पोहोचली असल्याचे दिसत आहे.

Post a Comment

0 Comments