Ticker

6/recent/ticker-posts

डेल्टा व्हेरियंटचा सर्वाधिक धोका या वयोगटातील लोकांना..



नवी दिल्ली | कोरोनाने संपूर्ण जगावर थैमान घातले आहे. देशात आताकुठे कोरोनाची दुसरी लाट ओसरतांना दिसून येत होते आणि स्थीती पूर्ववत होण्याची आशा व्यक्त होत होती. अशातच आलेल्या डेल्टा प्लस या नव्या प्रकाराने पुन्हा चिंता वाढवली आहे. 


तसेच कोरोना विषाणूचे डेल्टा आणि डेल्टा प्लस हे नवे व्हेरियंट धोकादायक ठरण्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. अशातच एक महत्त्वाची माहिती अभ्यासातून पुढे आली आहे. 


इंग्लंडमधील अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारात डेल्टा व्हेरियंट हा प्रकार मुख्य आहे. डेल्टामुळे इंग्लंडमध्ये 117 लोकांचा बळी गेला असून, त्यातील बहुतेक लोक 50 वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते. 


यामध्ये 38 लोकांनी लस घेतलेली नव्हती, तर 50 लोकांना दोन्ही डोस मिळाले होते. महत्वाचं म्हणजे, यातील 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे 6 लोक होते ज्यांना लस दिली गेली नव्हती. दैनिक भास्कर या वृत्तपत्राने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.


50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, तरुण, लस न घेतलेले तसेच लसीचा एकच डोस मिळालेले लोक अशा व्यक्तींना या डेल्टा व्हेरियंटच्या संक्रमणाचा सर्वाधिक धोका असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.


डेल्टा प्लस व्हेरियंट अतिशय वेगाने आणि सहजपणे फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो, असं नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑफ इम्यूनायझेशनचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments