Ticker

6/recent/ticker-posts

लस घेण्याआधी कोरोना चाचणी करण्याचे महापालिकेचे आदेश



पनवेल | नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता पनवेल महानगरपालिकेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आनंद गोसावी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. 


त्यानुसार पनवेलमधील नागरिकांना कोव्हिड रिपोर्ट निगेटिव्ह असल्यानंतरच आता लस मिळणार आहे. यामुळे नागरिकांना लस घेण्याआधी अँटीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे.


याबाबतचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व खासगी लसीकरण केंद्र आणि वर्कप्लेस CVC ला हे पत्र जारी करुन आदेश देण्यात आले आहेत.


कोणत्याही खासगी कोव्हिड लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची अँटीजेन व कोव्हिड RTPCR चाचणी करुन ती निगेटिव्ह असल्यास लसीकरण करावे. तर पॉझिटिव्ह आल्यास त्याला पुढील तपासणीसाठी पाठवावे, असं पनवेल महानगरपालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी म्हटलं आहे. 


मात्र, पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या या आदेशावर अनेक नागरिकांनी नाराजी दर्शवली आहे. कोरोना लसीकरणासाठी कोविड चाचणीचा अट्टाहास कशासाठी?, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments