Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूरात दारूबंदी उठवल्यानंतर वडेट्टीवारांची चक्क ओवाळणी; व्हिडीओ व्हायरल!




चंद्रपूर | राज्य सरकारकडून चंद्रपुर जिल्ह्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता. तो म्हणजे, 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यासाठी लागू केलेली दारूबंदी हटविण्याचा. जिल्ह्यात दारूबंदी असल्याने, गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते. 


मात्र, दारूबंदी उठविल्यामुळे चंद्रपूरमधील बारमालक आणि मद्यप्रेमी चांगलेच खूष झाल्याचे दिसून येत आहे. अशातच चंद्रपूरमधील एका बारमालकाचा व्हिडओ सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. 


या व्हिडिओत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा फोटो भिंतीवर लावलेला असून, बारमालक या फोटोची पूजा करतांना दिसत आहे. या व्हिडिओने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.


चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमधील हा व्हिडिओ आहे. संबंधित बारमालकाचे नाव गणेश गोरडवार असल्याचे सांगण्यात येत आहे. 


दारूबंदी उठविल्याने, मद्यप्रेमींकडून उत्साह व्यक्त केला जात आहे. विजय भाऊंनी खूप चांगले काम केले आहे. आम्हाला त्यांच्या कामाबद्दल इतका आनंद झाला की, आम्ही थेट त्यांच्या फोटोची आरती केली. कारण ते आजच्या परिस्थितीत आमच्यासाठी देवच ठरले, असे मत बारमालक गणेश गोरडवार यांनी व्यक्त केले आहे.


वैध दारू विक्रीमधून मिळणाऱ्या महसूलाचे मोठे नुकसान झाले असून गुन्हेगारी क्षेत्रातील खासगी व्यक्तींचा प्रचंड आर्थिक फायदा झाला आहे. त्यासोबतच बेकायदेशीर दारू व्यापारात स्त्रिया आणि मुले यांचा वापर केल

ल्या जात आहे. 


स्त्रिया आणि मुले यांच्या वाढत्या सहभागामुळे चिंता निर्माण करण्यासारखी परिस्थिती झाल्याची कारणे देत सरकारने चंद्रपूरची दारूबंदी उठविल्याचे सांगितले होते. 




https://twitter.com/harish_malusare/status/1413535271144939522?s=19

Post a Comment

0 Comments