Ticker

6/recent/ticker-posts

दुसऱ्या बायकोला घटस्फोट देऊन तिस-या लग्नाची तयारी करतोय हा अभिनेता




बॉलिवूडमध्ये एका नात्याला विराम देऊन दुसरे नाते सुरू करण्याची पद्धत काही नवीन नाही. याआधी देखील कित्येक अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यातील जोडीदारापासून वेगळे झाल्या आहेत. 


दररोज काही सेलिब्रिटींच्या ब्रेकअप किंवा पॅचअपच्या चर्चा होत असतात. अशातच मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आमिर खान आजकाल त्याच्या घटस्फ़ोटाच्या बातमीने चर्चेत आहे. 


15 वर्षाच्या संसारानंतर आमिर खानने किरणबरोबर घटस्फोटाची घोषणा केली आहे, त्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रकारच्या कमेंट्स आणि मेम्सचा पाऊस पडत आहे. काहीजण आमिर चे नाते फातिमा सना शेखशी जोडत आहेत. सना हे आमिर खानचे पुढील लक्ष्य आहे, असं देखील बोललं जात आहे. 


फातिमा सना शेख हे नाव जरी नवं असलं तरी ही दुसरी तिसरी कोणी नसुन आमिर खानची सह अभिनेत्री आहे. तीचा जन्म हैदराबाद येथे झाला. 


सना शेखने आपल्या करिअरची सुरूवात बालचित्र अभिनेत्री म्हणून सुरू केली होती. त्यांनी कमल हासनच्या ‘आंटी 420’, ‘वन टू का फॉर’, ‘बडे दिलवाला’ इत्यादी चित्रपटात काम केले आहे. पण तिची खरी ओळख आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटाद्वारे तिला मिळाली, त्यानंतर सर्वजण तिला “दंगल गर्ल” म्हणून ओळखतात.


या ‘दंगल गर्ल’ने देखील चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापूर्वी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावले आहे. तिने ‘बेस्ट ऑफ लक निकी’, ‘लेडीज स्पेशल’ आणि ‘अगले जनम मोहे बिया ही किजो’ मध्ये काम केले आहे. तसेच दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. मात्र, तेथे तीला यश मिळू शकले नाही.


याशिवाय फातिमा सना शेख एक उत्तम नर्तक आणि छायाचित्रकार देखील आहे.

Post a Comment

0 Comments