Ticker

6/recent/ticker-posts

चिंताजनक! पुढील महिन्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट; एसबीआयचा अहवाल



नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना डेल्टा प्लस या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. धोका हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. 


येणारी तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक ठरणार असून, देश त्याला सामोरे जाण्यासाठी किती तयार असेल, हा मोठा प्रश्न आहे. 


अशातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाकडून एक अहवाल सादर करण्यात आला आहे. यात कोरोनाची तिसरी लाट देशात पुढच्याच महिन्यात येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.


येणा-या तिसऱ्या लाटेचा प्रभाव हा 98 दिवसांपर्यंत जाणवेल. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास 10 हजार रुग्ण आढळून येतील. तर ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात ही संख्या वाढलेली असेल, असं देखील या अहवालात सांगण्यात आले आहे.


नीति आयोगाचे सदस्य डॉ. वी.के.पॉल म्हणाले की, कोरोना व्हायरसचे स्वरुप बदलले तर त्याचा मुलांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दोन ते तीन टक्के मुलांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे मुलांचे संरक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.


ही लाट दुसऱ्या लाटेइतकी गंभीर असेलच, हे ठामपणे सांगता येत नाही. देशातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाल्यास, मृत्यूची संख्या ही दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments