Ticker

6/recent/ticker-posts

सहकार क्षेत्रासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

From Facebook


नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 15 कॅबिनेट मंत्र्यांनी तसेच 28 राज्यमंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. 


या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह 4 जणांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारकडून एका नव्या मंत्रालयाची घोषणा करण्यात आली आहे.


मंत्रिमंडळ विस्तारात यापूर्वी मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशन म्हणजेच केंद्रीय सहकार मंत्रालयाची नव्याने स्थापना करण्यात आली असून, सहकार क्षेत्रासाठी मोदी सरकारने एक क्रांतीकारक निर्णय घेतला आहे. 


त्यानुसार या मंत्रालयाचा कार्यभार आता गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देण्यात आला असून, मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशनचा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांच्याकडे असणार आहे.


सहकार क्षेत्र हे प्रशासकीय आणि कायदेशीरदृष्टीने मजबूत व्हावे, या हेतूने सरकारने या नव्या मंत्रालयाची स्थापना केल्याची माहिती पुढे येत आहे. 


‘सहकारातून समृद्धी’ हा विचार डोक्यात ठेवून सरकारने या मंत्रालयाची स्थापना केली असल्याचे सांगण्यात येत आहे. या मंत्रालयाद्वारे बहुराज्य सहकारी संस्थांचा विकास होणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments