Ticker

6/recent/ticker-posts

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांमध्ये 89 पदांवर भरती



नवी दिल्ली | संरक्षण मंत्रालयांतर्गत सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयाने देशभरातील विविध सेक्टर युनिट्स आणि डेपोमध्ये ग्रुप सी सिव्हिलियनच्या पदांवर भरतीसाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे.


या जाहिरातीनुसार पुण्यातील युनिटमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ, स्टोअर कीपर, लोअर डिव्हिजन लिपिक इत्यादींच्या 89 जागा रिक्त आहेत.


इच्छुक उमेदवार, भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाईट, indianarmy.nic.in वर अर्ज भरू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2021 निश्चित करण्यात आली आहे.


10 मिनिटांत प्रति मिनिट 80 शब्दांच्या वेगाने डिक्टेशन आणि इंग्रजीमध्ये 50 मिनिटांत टायपिंग स्पीड आणि हिंदीमध्ये संगणकावर 65 मिनिटांत टायपिंग स्पीड असावी, अशी अट या पदांसाठी देण्यात आली आहे. 


सशस्त्र बल वैद्यकीय सेवांमध्ये स्टेनोग्राफर पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून 12 वी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे. 


यासंबंधीची अधिक माहिती सैन्याच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेली आहे.

Post a Comment

0 Comments