Ticker

6/recent/ticker-posts

दहावी, बारावीच्या परीक्षा आता वर्षातून दोन वेळा

From Pixabay


नवी दिल्ली |  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी शाळा, महाविद्यालये कधी सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


अशातच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून म्हणजेच CBSE कडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक परीक्षेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.


शैक्षणिक वर्ष 2021-22 चे विभाजन बोर्डाकडून आता 2 भागात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. त्याचबरोबर पूर्वी पेक्षा आता अभ्यासक्रमही कमी करण्यात आला आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये कधी सुरू होणार, हे सांगणे कठीण आहे. परंतू विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकासाच्या दृष्टीने परीक्षा घेणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत परीक्षा घेण्याची शक्यता कायम राहावी, यासाठी वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.


सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा जरी वर्षातून दोनवेळा होणार असल्या, तरी अभ्यासक्रम तोच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्याच्या असाईनमेंट्स आणि प्रॅक्टिकल अभ्यासावर भर देण्यात येणार असून त्याचे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments