नवी दिल्ली | येत्या 1 जुलैपासून एसबीआय बॅंकेच्या खातेदारांसाठी एक नवा नियम लागू होणार आहे. बँकेकडून ही महत्वाची माहिती देण्यात आली आहे. यानुसार आता एका महिन्याला किमान चार विनामूल्य कॅश विड्रॉलनंतर करण्यात येणा-या पुढच्या व्यवहारांवर(विड्राॅल) बँकेकडून शुल्क आकारण्यात येणार आहे.
त्याचबरोबर एका वर्षात 10 पानांपेक्षा अधिक पानांच्या चेक बुकसाठी शुल्क आकारले जाणार आहे. तसेच बीएसबीडी खात्यातील सेवा शुल्कामध्ये बदल करण्यात आले आहेत.
बँकेत खाते असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मात्र चेकबुक सेवांवर सूट देण्यात आली आहे, असेही बँकेने सांगितले आहे.
त्यामुळे 1 जुलैपासून या कामांसाठी बँकेकडून 15 ते 75 रुपये आकारण्यात येणार आहे. चेक बुकच्या 10 पानांसाठी 40 रुपये व 25 पानांसाठी 75 रुपये शुल्क आकारण्यात येईल. यासाठी जीएसटी मात्र वेगळा आकारला जाईल.
बीएसबीडी खातेधारकांसाठी शाखांमध्ये, एटीएममध्ये, सीडीएममध्ये विना-आर्थिक व्यवहार आणि हस्तांतरण व्यवहार विनामूल्य असतील. अतिरिक्त जीएसटी असलेल्या शाखा, एसबीआय एटीएम किंवा इतर बँक एटीएममधून चार मोफत कॅश विथड्रॉलपेक्षा जास्त व्यवहारावर ते प्रति विथड्रॉलवर 15 रुपये शुल्क आकारेल, असं एसबीआयने म्हटले आहे.


0 Comments