Ticker

6/recent/ticker-posts

नोकरीची संधी | विविध शासकीय विभागात 10475 जागांची पदभरती सुरु

nokri margadarshan

जर आपण शासकीय नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी असून सध्या विविध शासकीय विभागांमध्ये तब्बल 10475 रिक्तपदे असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.  

 

या नोकरभरती मध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असून  भारतीय रेल्वेमध्ये अप्रेन्टिस म्हणून नोकरीची संधी उपलब्ध आहे.

 

अप्रेन्टिस पदासाठी दक्षिण रेल्वेने 3378 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून 30 जून 2021  पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेने सुद्धा त्यांच्या अधिनस्त कार्यक्षेत्रासाठी 3591 अप्रेन्टिस पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता अर्ज मागविले आहेत.

 

त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून 2021 आहे. या भरतीसाठी आयटीआय उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. याशिवाय जिल्हा न्यायालय पुणे अंतर्गत सफाईगार पदे भरण्यात येत आहेत. या पदांसाठी शिक्षणाची कोणतीही अट नसून उमेदवार केवळ शारीरिकदृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे आहे.

 

भारतीय वायू दलात काम करणे हे अत्यंत आव्हानात्मक असले तरी अनेकांचे ते स्वप्न असते. ती संधी देखील सध्या उपलब्ध असून पदवीधर, अभियांत्रिकी पदवीधर तसेच एनसीसी सी डिव्हिजन प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येतील.

 

कोणतीही परीक्षा देता थेट इयत्ता दहावी बारावीच्या गुणांच्या आधारे निवड होत असल्याने गेल्या काही काळापासून डाक विभाग गुणवंत बेरोजगारांसाठी एक उत्तम संधी म्हणून पुढे आला आहे. भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, डाक सेवक पदांच्या 2428 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.

 

मात्र ऑनलाईन अर्ज भरताना अनेकांना अडचणी गेल्याने दोन वेळा या भरतीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीत सुरु असून 10 जून 2021 पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. तरी जे उमेदवार तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरू शकले नाही त्यांना अर्ज भरता येईल.  

 

मुख्य म्हणजे महिलांसाठी अर्ज प्रक्रिया निःशुल्क आहे. या शिवाय नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन वसई विरार महानगरपालिकेतही विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.

 

या संपूर्ण भरती प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन या संकेतस्थळाला भेट द्यावी. नियमीत नोकरभरतीच्या माहितीसाठी गुगलवर www.naukrimargadarshan.com असे सर्च करा.

 

Post a Comment

0 Comments