Ticker

6/recent/ticker-posts

डेल्टा प्लस विषाणुचा संसर्ग फुफ्फुसावर होण्याची शक्यता अधिक – डॉ. एन. के. अरोरा

From Pixabay


नवी दिल्ली | कोरोनाने संपूर्ण जगावर थैमान घातले आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरतांना दिसून येत आहे. परंतू असे असतांनाच कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. 


कोरोनाच्या या नव्या प्रकारामुळे देशात पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे. याचबरोबर तज्ज्ञांकडून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. 


त्याचबरोबर डेल्टा प्लस या विषाणुमुळे फुफ्फुसाच्या संसर्गाचा धोका अधिक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोना वर्किंग ग्रुपचे प्रमुख असलेले डॉ. एन. के. अरोरा यांच्यानुसार, कोरोनाच्या अन्य विषाणुंच्या तुलनेत डेल्टा प्लस या विषाणुची फुफ्फुसाच्या टिश्‍युंवरील मारक क्षमता अधिक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 


पुढे ते म्हणाले, या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून सरकार प्रयत्नशील आहे. या विषाणुंच्या अस्तित्वाबाबत आणि त्यांच्या रचनेबाबत माहिती जास्त फैलाव होण्याआधीच समजल्याने, त्यावर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे जाणार आहे, असंही अरोरा यांनी म्हटले आहे.


पीटीआयशी बोलतांना अरोरा म्हणाले, या विषाणुबाबत सखोल अभ्यास सुरू असून, त्याचे रूग्ण हे जास्त आढळून आल्यानंतर त्याच्या प्रसाराचा पॅटर्न लक्षात येईल. 


त्याचबरोबर ज्या व्यक्तींचे लसीकरण झालेले आहे, त्यांच्यावर या विषाणुंचा परिणाम सौम्य असू शकतो, असे देखील ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments