Ticker

6/recent/ticker-posts

तरुणीला चुकीने एकाच वेळी कोरोना लसीचे 6 डोस.....





नवी दिल्ली |  संपूर्ण जगावर थैमान घातलेल्या कोरोनाने प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. पहिल्या लाटेच्या पाठोपाठ दुसरी लाट कधी सुरू याचा पत्ताही लागला नाही. आता तर तिसरी लाट कधी येईल याबद्दलही सांगता येत नाही. प्रत्येक देशात आज कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी औषधी, व्हॅक्सीन तयार करण्यासाठी अजूनही धडपड सुरू आहे. 


काही देशात तयार करण्यात आलेल्या व्हॅक्सीनचे डोस त्या देशातील नागरिकांना देखील देण्यात येत आहे. परंतू लसीकरणाशी संबंधीत एका माहितीने प्रचंड खळबळ उडाली आहे. 


इटलीमध्ये एका तरुणीला चक्क 6 लसींचे डोस देण्यात आले आहेत. साधारणतः कोरोनाशी लढण्यासाठी लसीचे दोन डोस पुरेसे असल्याचे सांगितले गेले आहे. परंतू या 23 वर्षीय मुलीला फायझर-बायोटेक लसीचे एकाच वेळी 6 डोस देण्यात आल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. या संदर्भात एजीआयने सोमवारी दिलेल्या वृत्तात, चुकून महिलेला इतके डोस दिले गेल्याचे स्पष्ट केले आहे. 


लसीचे ओव्हरडोस घेतलेल्या या तरूणीची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय तीच्यावर लसीचा कुठलाही दुष्परिणाम झालेला नाही. दरम्यान, लस घेतल्यानंतर लगेचच तिला फ्लुइड्स आणि पॅरासिटामाॅल देण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे. 


सध्या ही लस 90 देशांतील लोकांना दिली जात आहे. लवकरच ही कंपनी सिंगापूरमध्येही या लसीचे उत्पादन सुरु करणार आहे. देशाच्या वैद्यकीय नियामकांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली असल्याचं ‘एएफपीच्या’ वृत्तानुसार सांगण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments