Ticker

6/recent/ticker-posts

चार वर्षाच्या मुलीला पाच वेळेस तुरुंगवास




या जगात कुठलाही गुन्हा करणा-या व्यक्तीला त्या-त्या देशातील कायद्याप्रमाणे शिक्षा दिली जाते. गुन्हा करणारी व्यक्ती स्त्री असो वा पुरूष तिला शिक्षा ही दिली जातेच. याचे स्वरूप मात्र गुन्ह्यांनुसार आणि त्या देशातील कायद्यानुसार वेगळे असू शकते. 


बरेचदा असं ऐकायला येतं की, गुन्हा केलेल्या व्यक्तीसोबत त्याची मुलगी किंवा मुलगा याला देखील तुरूंगात नेण्यात येते. अशाच एका 4 वर्षाच्या मुलीबद्दल ही माहिती आहे, जी आपल्या वयाच्या जास्त वेळा म्हणजेच 5 ते 6 वेळा तुरूंगात गेली आहे.


ऐवढ्या लहान मुलीला तुरूंगवास कसा काय होऊ शकतो? असा कुठला गुन्हा या मुलीने केला? लहान मुलांकडून एखादा गुन्हा झाला असल्यास, त्यांना बाल सुधारगृहात पाठविल्या जाते. असे अनेक प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात नक्की आले असतील.


पण या मुलीला मात्र महिला कैद्यांसमवेत तुरुंगात जावे लागले आणि तेही अनेकदा. ही घटना, उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यात घडली आहे. जेथील एक महिला आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी आणि आपला उदरनिर्वाह करण्यासाठी चोरी करते.


आणि चोरी केल्यामुळे या महिलेला अनेकदा तुरुंगात जावे लागते. या महिलेजवळ कुठलाही पर्याय नसल्याने तीला तिच्या चिमुकलीला देखील तुरंगात सोबत न्यावे लागते. या मुलीच्या आईचे नाव आहे रेशमा. ती चोरांच्या टोळीत राहते. 


त्यानुसार ती ट्रेनमध्ये किंवा इतरत्र चोरी करणे, अशी कामे करते. ती जेव्हा जेव्हा चोरी करताना पकडल्या जाते, तेव्हा तेव्हा ती आपल्या 4 वर्षाच्या मुलीला नेहमीच तुरूंगात घेऊन जाते.


अशा परिस्थितीत या लहान मुलीला कुठलाही दोष नसंताना तुरंगवास भोगावा लागत आहे.

Post a Comment

0 Comments