Ticker

6/recent/ticker-posts

तुम्हालाही प्रवासात मळमळ होते का? मग करा हा उपाय..




प्रवास करायला प्रत्येकाला आवडतं. पण त्या प्रवासादरम्यान होणाऱ्या त्रासामुळे अनेक जण प्रवास करणे टाळतात किंवा सतत त्यांना आपल्यासोबत गोळ्या ठेवाव्या लागतात. हा होणारा त्रास म्हणजे मळमळ किंवा उलटी होणे.


नाना प्रकारचे उपाय करूनही हा त्रास थांबता थांबत नाही. त्यात घाटाचा रस्ता आला की आपल्याला हा प्रवास नकोसा होतो. सततची होणारी मळमळ उलट्या यामुळे डोके देखील दुखायला लागतं. आणि यामुळे पुढचा प्रवास करायची इच्छा देखील मरून जाते.


प्रवासादरम्यान बाहेरचं काही खाण्यासाठी देखील यामुळे टाळाटाळ केल्या जाते. परंतु सांगितलेल्या या साध्या घरगुती उपायाने तुमची मळमळ ही काही वेळासाठी का होईना पण थांबण्याचे काम नक्की होईल. परंतू प्रवासाला निघण्यापूर्वी काही गोष्टींचे पालन करणे अतिआवश्यक असते, हे विसरून चालणार नाही. 



प्रवासाला निघतांना आहार हा हलक्‍या स्वरूपाचा घ्यायला हवा. तिखट, मसालेदार, तळलेले पदार्थ न खाल्लेले बरे. कारण हे पदार्थ प्रवासा दरम्यान पचायला जड असतात. यामुळे मळमळ, उलटी ला देखील निमंत्रण दिल्या जाते. अशावेळी प्रवासादरम्यान शक्य झाल्यास कुठलेही शरबत सोबत ठेवावे.


खाली सांगितलेल्या काही पदार्थांचे सेवन केल्यास तुम्हाला उलटी पासून नक्की आराम मिळू शकतो.......



• प्रवासादरम्यान मळमळ किंवा उलटी होत असल्यास एखादे केळ खावे. खेळामध्ये असलेल्या फायबर्स आणि पोटॅशियम मुळे शरीराला फायदा होतो.


• प्रवासाला निघताना तुप भात शक्य असल्यास सोबत घ्यावा. त्यामुळे मळमळ थांबण्यास मदत होते.


• प्रवासादरम्यान पाणी आणि शक्य झाल्यास बर्फाचा तुकडा सोबत ठेवावा. यामुळे देखील शरीराला आराम होतो आणि मळमळ त्रास कमी होतो.


• अशावेळी आल्याचा तुकडा किंवा आलेपाकाची वडी सोबत ठेवल्यास देखील आराम पडतो.


• आयुर्वेदात वेलदोड्याला याला फार मोठे महत्त्व आहे. त्याला मळमळी साठी फार गुणकारी औषध मानल्या जाते. मळमळ वाटल्यास वेलदोड्याचे दाणे तोंडात ठेवल्यास मळमळीचा त्रास थांबण्यास लगेच मदत मिळते.


आजीच्या पिशवीतून घेतलेले हे काही घरगुती उपाय आहे. पण एखाद्या व्यक्तीला जास्त त्रास होत असल्यास त्यांनी तज्ञांच्या सल्ला नक्की घ्यावा.

Post a Comment

0 Comments