Ticker

6/recent/ticker-posts

मृतदेह दिल्लीत, कुटूंब परदेशी.... नियतीचा असाही खेळ

पत्नी मात्र एकटीच परतली मायदेशी...........

मृतदेह दिल्लीत, कुटूंब परदेशी.... नियतीचा असाही खेळ


नवी दिल्ली | नियतीचे चक्र कधी फिरेल हे सांगता येत नाही. मोहम्मद रहीम हे गृहस्थ आपल्या पत्नीच्या उपचारासाठी 20 मार्चला भारतात आले होते. त्यांच्या पत्नीला कॅन्सर असल्यामुळे अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे रहीम हे मध्य दिल्लीच्या नबी करीम येथील एका हाॅटेलमध्ये राहत होते. 


रहीम हे अफगाणिस्तान सेनेचे निवृत्त मेजर जनरल असून ते सैन्याचे मोठे अधिकारी राहिले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान त्यांची माहिती पुढे आली. मेजर मोहम्मद रहीम वर्धक (रहीम) हे वयस्कर होते.


पत्नीचा उपचार पूर्ण झाल्याने ते 24 एप्रिलला आपल्या मायदेशी परतणार होते. मात्र 20 एप्रिलला पत्नीचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला. परंतू मायदेशी जाण्याच्या आनंदाने त्यांनी स्वतःची चाचणी करणे टाळले.


24 एप्रिलला त्यांच्या पत्नीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्यामुळे त्या दुतावासाच्या मदतीने मायदेशी निघून गेल्या. परंतू त्याच दिवशी त्यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. 


पोलिसांनी दुतवासाच्या मदतीने अंतिम विधीसाठी रहीम यांच्या कुटुंबियांशी संपर्क केला. मात्र त्यांच्या मुलाने कोणालाच भारतात यायला जमणार नाही, असं सांगून मृतदेह दफन करायला सांगितला. 


दूतावास अधिकारी अतीक उर्र रहमान यांच्या उपस्थितीत पोलिसांनी 27 एप्रिल रोजी रहीम यांना भारतात दफन करून त्यांना श्रद्धांजली दिली.

Post a Comment

0 Comments