Ticker

6/recent/ticker-posts

‘श्रीदेवी : द एटरनल स्क्रीन गॉडेस’ या पुस्तकाच्या लेखकाने केला रहस्यमय खुलासा



बॉलिवूड जगतात अनेकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. अभिनयाची उत्कृष्ट कला आणि सुंदर असा मनमोहक चेहरा बघितला की, अनेकांच्या काळजाचे ठोके थांबून जात. 


पण अनेकांच्या दिलाची ही धडकन अचानक निघून गेल्याने लाखो चाहत्यांना दुःख झाले. अनेकजण अजूनही तिच्या आठवणीत रमतात. परंतू नुकत्याच एका लेखकाने श्रीदेवींवर लिहीलेल्या पुस्तकात एका वेगळ्याच रहस्याचा उलगडा केला आहे. त्यामुळे चाहत्यांना वेगळाच धक्का बसला आहे. 


या पुस्तकाचे नाव ‘श्रीदेवी : द एटरनल स्क्रीन गॉडेस’ असे आहे. तर सत्यार्थ नायक असे लेखकाचे नाव आहे. पुस्तक पूर्ण होण्याआधी लेखकाचा विचार बदलला होता. पण आता त्यांनी हे पुस्तक पूर्ण केले आहे. 


या पुस्तकाच्या लेखकाने माध्यमांशी बोलतांना एक मोठा खुलासा केला आहे. तो म्हणजे, हे पुस्तक पूर्ण करण्यासाठी नायक यांची श्रीदेवींना भेटण्याची इच्छा होती, त्यासाठी त्यांनी तीच्याकडे वेळही मागितला होता.परंतू त्यावेळी श्रीदेवीने तिच्या मुलीच्या चित्रपटाचे काम पूर्ण झाल्यानंतर वेळ देऊ शकेल, असे म्हटले होते.



पण दुर्दैवाने जान्हवी कपूर हिच्या धडक या चित्रपटाच्या रिलीजआधीच श्रीदेवी हे जग सोडून गेली. यामुळे नायक हे खूप दुःखी झाले आणि त्यांनी पुस्तक न लिहिण्याचा विचार केला. आता मात्र त्यांनी हे पुस्तक पूर्ण केले आहे.


नायक पुढे सांगतात की त्यांना श्रीदेवीला भेटून काही तरी गुपित सांगायचे होते, पण त्याआधी श्रीदेवींनी या जगाचा निरोप घेतला. 


या पुस्तकातून नायक यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे. जे तिला नको होते, परंतु आता ती नसल्याने त्याने तीला श्रद्धांजली दिली आहे. 


या पुस्तकातील सत्यता मांडण्यासाठी 70 कलाकारांशी बोलून, हे पुस्तक तयार केले असल्याचं ही सांगितले आहे. त्याचबरोबर हे पुस्तक लिहिण्यासाठी बोनी कपूर यांनी उत्तेजीत केले, त्यामुळे हे पुस्तक आज पूर्ण झाले.

Post a Comment

0 Comments