Ticker

6/recent/ticker-posts

व्हाॅट्सअपच्या 'या' नव्या फिचर्स बद्दल वाचलं का?

इंटरनेटशिवाय वापरता येणार 





नवी दिल्ली | आपल्या प्रायव्हसी पाॅलिसी साठी वादाच्या भोव-यात सापडलेल्या व्हाॅट्सअपने आता नवीन फिचर्स आणल्याने वापरकर्त्यांना याचा खुप मोठा फायदा होणार आहे. जगातील अनेक देशांमध्ये मेसेजिंग अॅप्लिकेशन असलेल्या व्हाॅट्सॲपचे लाखो, करोडो वापरकर्ते आहेत. यातील काही तर प्रथम पसंती इतर अॅप्लिकेशन पेक्षा व्हाॅट्सअपला दर्शवतात.


आपल्या वापरकर्त्यांसाठी व्हाॅट्सअप नेहमीच नवनवीन फिचर्स घेऊन येतो. त्यामुळेच व्हाॅट्सअप अव्वल स्थानी आहे. मागील अनेक दिवसांपासून वाट बघत असलेले नवे फिचर्स आता वापरकर्त्यांच्या भेटीला येणार आहे. 


व्हाॅट्सअॅपच्या नव्या सर्वांनाच होती. व्हाॅट्स अॅपचे एक नवीन फिचर आता येत आहे. यातील विशेष बाब म्हणजे, यात इंटरनेटचा वापर न करता देखील व्हाॅट्सअॅपचा वापर करता येणार आहे.


या फिचर्सचा उपयोग वेब व्हर्जन व्हाॅट्सॲपला देखील होणार आहे. त्यामुळे मोबाइलपमाणेच, संगणकावर किंवा लॅपटॉप वर व्हाॅट्सअप चालवितांना इंटरनेट असणं बंधनकारक नसेल. 


या नव्या फिचर्सचा आणखी एक फायदा म्हणजे, ते आल्यानंतर डेस्कटॉपवर किंवा लॅपटाॅपवर व्हाॅट्सअपचा वापर करण्यासाठी फोनची गरज पडणार नाही. यामुळे भविष्यात डेस्कटॉपवर व्हाॅट्सअॅपचा वापर करण्यासाठी मोबाइलवरून क्युआर कोड स्कॅन करण्याची गरज पडणार नाही. कंपनी व्हाॅट्सअप वेबसाठी अॅक्टिव मोबाइल कनेक्शनचं बंधन काढून टाकणार आहे, अशी माहिती हॅकरेडने दिली आहे. 


व्हाॅट्सअप वर करण्यात येणारा आणखी एक नवा आणि महत्वाचा प्रयोग म्हणजे यात एकच अकाऊंट चार ठिकाणी वापरता येणार आहे. यातही मेन डिव्हाईसला इंटरनेटची गरज पडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments