Ticker

6/recent/ticker-posts

फुफुस होईल धुतल्यासारखे... जर घेतले दोन घरगुती पदार्थ



घरात लहान असो वा मोठे आरोग्याचा त्रास हा कधीनाकधी सर्वांनाच होतो. एकवेळचं अन्न आणि पाण्याशिवाय आपण काही दिवस उपाशी राहू शकतो. परंतु ऑक्सिजन शिवाय जगणे, हे तर कठीणच आहे. 


आपल्या शरीरातील सतत कार्य करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, आपले फुफ्फुस होय. ते जर चांगले असेल, तर वातावरणातील ऑक्सिजन आपल्या शरीरात चांगल्याप्रकारे मिक्स होण्याचे काम केल्या जाते. आणि त्याद्वारे कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकला जातो. ही सर्व क्रिया जर व्यवस्थित असेल तर शरीर देखील स्वस्थ राहतं. त्यामुळे आपलं फुफ्फुस हे 100% काम करणं फार गरजेचं असतं.


सध्याच्या परिस्थितीत सुरू असलेल्या कोरोनामुळे हे फुफ्फुस निरोगी ठेवणं जास्त गरजेचे आहे. कारण आज ऑक्सिजनच्या अभावी कितीतरी लोकांचा मृत्यू होतांना आपल्याला दिसत आहे. अनेकांचे फुप्फुस हे कोरोनामुळे निकामी होत चालले आहे. त्यामुळे खबरदारी घेणे हे कधीही चांगले. तेव्हा फुफुसाची कार्यशक्ती वाढविण्यासाठी घरातील हे दोन पदार्थ फार महत्त्वाचे आहे.


यातील पहिला पदार्थ म्हणजे जवस. ज्याला इंग्रजीत फ्लॅक्स सीड म्हणतात. जवस हे आपल्या घरी किंवा दुकानात सहजासहजी उपलब्ध असते. एक ग्लास पाणी उकळायला ठेवून, त्यात चमचाभर जवस घालावे. जवस हे फुफ्फुसाचे रोग बरे करण्यासाठी, त्याचबरोबर सर्दी, खोकला, घसादुखी, निमोनिया यांसारख्या आजारांवर उपायकारक आहे. यामध्ये ओमेगा-3 असून, यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी केल्या जाते. 


दुसरा पदार्थ आहे तीळ. तीळामध्ये अशा प्रकारचे घटक असतात की, ज्यामुळे श्‍वसनाचे आजार दूर होतात. यामुळे कफ निघून जातो आणि शरीराला ऊर्जा देखील मिळते. यासाठी एक चमचा तीळ, थोडसं मीठ एक ग्लास उकळत्या पाण्यात घालावे. हे पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत, उकडू द्यावे. चांगल्या प्रकारे उकडल्यानंतर त्याला गाळून घ्यावे.


पाणी गार झाल्यानंतर, थोडंसं चिकट असलेल्या या पाण्यात चमचाभर मध मिसळावे. या उपांत्य मध हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परंतू ज्या व्यक्तींना मधुमेह आहे, त्या व्यक्तींनी मध न टाकता या पाण्याचे सेवन करावे.


सकाळी उपाशी पोटी सलग सात दिवस हे पाणी पिल्यास, शरीरातील ऑक्सिजन लेवल तर वाढेलच त्यासोबतच कफ देखील दूर झालेला असेल आणि खूप फुफ्फुसाचे आरोग्य देखील जपल्या जाईल.

Post a Comment

0 Comments