Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. गवई यांचे वडिलांच्या तेरवीला आईने देखील प्राण सोडले

 डॉ. मनिष गवई यांचे कुटुंबावरील या आघाताने हळहळअमरावती -डॉ. मनिष गवई यांचे मातोश्री सौ शोभाताई शंकरराव गवई रा किशोर कॉलनी अमरावती  यांचे आज दिनांक. 28/05/2021 रोजी सकाळी झेनिथ हॉस्पिटल अमरावती येथे दीर्घ आजाराने निधन. झाले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार, यांचे जनसंपर्क अधिकारी तथा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे राज्यपाल नामीत सिनेट सदस्य, डॉ. मनिष गवई यांच्या मातोश्रीचे कोरोना बरे झाल्यानंतर फुफुस निकामी झाल्याने दीर्घ आजाराने निधन झाले. विशेष म्हणजे डॉ. मनिष गवई यांचे वडिलांच्या तेरवीला आईने देखील प्राण सोडले. निधनाच्या वेळी त्यांचे वय ६३ वर्षाचे होते.


 आई वडील आयसीयुवर असताना डॉ. मनिष गवई यांनी आपल्या सामाजिक दायित्वाचा परिचय देत रुग्नालयातच जागतिक परिचारिका दिन साजरा करून रुग्नालयात कार्यरत परिचारिकांचा सन्मान केला. सौ शोभाताई शंकरराव गवई  यांचा जन्म चांदुर बाजार तालुक्यातील माधान या गावी गरीब कुटुंबात खंडारे घराण्यात शेतकरी कुटूंबात झाला घरामध्ये गरीबीची परिस्थिती असतांना सुध्दा कसे-बसे आपले शालेय शिक्षण माधान तेथील कस्तुरबा कन्या शाळा पुर्ण करून अमरावती येथे त्यांचा विवाह गवई परिवारात शंकरराव गवई यांच्याशी झाला. पुढे त्यांनी मोल मजुरी करून गवई परिवाराला उभे करण्याचे काम त्यांनी केले.


 अतिशय कठीन परिस्थिती मध्ये त्यांनी आपला मुलगा डॉ. मनिष गवई यांना उच्च शिक्षण दिले. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आपली शेतजमीन देखील गहान ठेवली होती तसेच आपले मंगळसूत्र गहाण ठेऊन कॉलेजजी फी भरली होती दलित समाजाच्या विकासासाठी सुध्दा त्यांनी विषेश कामगीरी केलेली आहे. असा  डॉ. मनिष गवई यांचे आईचा जिवन संघर्ष राहला आहे. काही काळ त्या रिपाई गवई गटाच्या सक्रिय पदाधिकारी देखील होत्या व सामाजिक कार्यात त्यांचा सतत सहभाग असायचा. मनीष तू खूप मोठा हो हे त्या सातत्याने आपल्या मुलाला सांगायच्या. मृत्यूच्या अंतिम घटका मोजत असताना मनीष तू स्वतःला व परिवाराला सांभाळ तसेच समाजासाठी नेहमी चांगलं कर असा सल्ला दिला व प्राण त्यागले .

गवई कुटुंबावरील या आघाताने शहरात व जिलयात  हळहळ व्यक्त केल्या जात आहे.त्यांचे आईचे शोक संवेदनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव ठाकरे, श्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री भारत सरकार,  मा. रामदास आठवले (केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार), मा. संजय धोत्रे, केंद्रीय शिक्षण  राज्यमंत्री भारत सरकार) समाज कल्याण बोर्डाचे अध्यक्ष - दादा ईधाते, पालकमंत्री- मा. ॲड. यशोमतीताई ठाकुर, खासदार- मा.नवनितताई रवि राणा, आमदार- मा.रवि राणा, आमदार- मा. बळवंत वानखडे, मानव अधिकार आयोगाचे सदस्य- मा. डॉ. ज्ञानेश्वर मुळे,डा राजेद् गवई सजय आठवले डॉ हेमंत मुरके आदींनी डॉ. गवई यांना सांत्वना दिली.


निधनाची बातमी कळताच मातोश्री वरून डॉ. गवई याना मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचा फोन तुझी आई खूप महान होती तिचे स्वप्न पूर्ण कर… फोन द्वारे डॉ. गवई यांना सांत्वना दिली.

Post a Comment

0 Comments