Ticker

6/recent/ticker-posts

स्मार्ट फोनने उलगडलं पत्नीच्या प्रेमाचं गुपीत...पतीने घेतला घटस्फ़ोट




एक वेळ अशी होती की एखाद्याला संपर्क करणे म्हणजे मोठे जोखमीचे काम होते. त्यातही बरोबर व्यक्तीलाच निरोप मिळाला असेल की नाही, याची शाश्वती देता येत नव्हती. हळूहळू यात क्रांती झाली. आणि आज आपण स्मार्ट फोनच्या दुनियेत एकमेकांच्या जास्त संपर्कात आलो. आज एका वेळी अनेकांना निमंत्रण जरी द्यायचं असेलं तरी ते वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आपल्या हातात असलेल्या स्मार्टफोनद्वारे देता येतं.


आज तंत्रज्ञानाच्या बळावर सातासमुद्रापार असलेल्या व्यक्तीसोबत देखील संपर्क करता येतो. याचबरोबर अनेक अनोळखी व्यक्तींना वेगवेगळ्या कामांसाठी एकत्र येता येतं. व्हाॅट्सअप, फेसबुक, स्नॅपचॅट, इं-स्टाग्राम, यांसारख्या माध्यमांनी यात मोठी भर टाकली.


परंतू सोशल मीडियाच्या माध्यमातून जग जेवढे जवळ आले. कामं जेवढी सोपी झालीत त्याहून अधिक गै-रप्रकार देखील समोर आले. आपल्या माहितीचा, फोटोचा कुणालाही गैरवापर करता येतो. अनेकांच्या ह्रदयाची ऑनलाईन वायरही जोडली जाते. यातूनच चॅटींग, डेटिंग, आणि नंतर पुढे काय काय होत जातं.



त्यानंतर डेटिंग ॲपसारखी अनेक मॅच मेकिंग ॲपमध्ये देखील असेच काहीसे प्रकार बघायला मिळतात. एकमेकांना डेट करून आपल्याला हवे ते मिळवण्याची कितीतरी उदाहरणं सापडतील. 


अशाच एका गैरप्रकारातून एका पत्नीला तिच्या पतीने चक्क घटस्फ़ोट दिला आहे. या महिलेने एका ॲपच्या माध्यमातून एका परपुरूषाची संपर्क केला. दोघांनीही एकमेकांच्या माहितीची देवाणघेवाण केली. त्यानंतर दोघेही बोलू लागले. एकमेकांना भेटू लागले बाहेर फिरायला जाऊ लागले. यातूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. 


मात्र, आपल्या पत्नीवर संशय आल्याने पतीने पत्नीचा स्मार्ट फोन चेक केला. यातील एका ॲपमध्ये त्याच्या पत्नीने दुस-या पुरूषाशी केलेल्या चॅटींग्स उघडकीस आल्या. त्यातील एक फोटो पाहून पतीचा चांगलाच संताप उडाला. त्यानंतर पतीने त्याच्या पत्नीला त्या फोटोच्या आधारे सरळ घटस्फोट दिला. 


जे ॲप मनोरंजन करू शकतात तेच एकमेकांचे संसार उध्वस्त करू शकतात, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Post a Comment

0 Comments