Ticker

6/recent/ticker-posts

एका ‘वेश्याची’ लॉकडाउन मधली व्यथा...ओढवली बिकट परिस्थिती



गेल्या वर्षापासून धुमाकूळ घातलेल्या कोरोनाने सर्वांनच एकमेकांपासून दूर केले आहे. अनेकांचे कुटूंब या कोरोनाने उध्वस्त केले आहे. कोरोनाच्या या संकटात जगण्यापेक्षा मरण स्वस्त झाले आहे. एकीकडे कोरोनाने रूग्णसंख्या वाढली आहे, तर दुसरीकडे सततच्या लाॅकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 


कोरोनामुळे जसा मृत्यूचा आलेख वाढतो आहे, तसाच आर्थिक संकटामुळे अनेक जण टोकाचे पाऊल उचलत आहे. अनेकांच्या कुटूंबाचा आधार कोरोनाने हिरावून घेतल्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले आहे. अजुनही ही परिस्थिती तशीच आहे. उपासमारीच्या या झळा खूप जणांनी सोसल्या आहेत आणि अजूनही काही जण त्या सोसत आहेत. 


लॉकडाऊनचा फटका अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना बसला. त्यातील एक व्यवसाय ज्याकडे अनेकजण पाठ फिरवतात. तो व्यवसाय म्हणजे वेश्या व्यवसाय. या व्यवसायाचा कोणीच विचार केला नाही. पण हा व्यवसाय करणा-या एका पिडीत वेश्याने मात्र तिच्यावर ओढावलेल्या वाईट स्थितीची व्यथा सगळ्यांसमोर मांडली आहे.




राजस्थान मधील अजमेर जिल्ह्यात वास्तव्यास असणारी नमिता हिने आपल्या व्यवसायाची सद्यस्थिती लोकांसमोर आणली आहे. लॉकडाऊन मुळे त्यांच्या उदरनिर्वाहाची सगळी दारं बंद झाली आहे. कुटूंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी फक्त पोटापुरतेच पैसे सध्याच्या परिस्थितीत मिळत असल्याने फार भिषण परिस्थिती ओढवली आहे. 


कुटूंबातील सदस्यांच्या लपून हा व्यवसाय ती करते आहे. तिच्या घरच्यांना ती आॅफीस मध्ये काम करून घर चालवते, असे वाटते. त्यामुळे आॅफीसमध्ये काम करणाऱ्या लोकांचे जसे घरात बसून काम आणि पगार सुरू आहे, असेच त्यांच्या घरच्यांना वाटते. 


नमिताच्या घरची परिस्थिती ही अत्यंत दयनीय असून तिला दोन मुले आणि नवरा दारुडा आहे. कुटूंबातील कोणतीही जबाबदारी नवरा घेत नसल्याने तिच कुटूंबाचा नी मुलांचा सांभाळ करते. तिच्याकडे रेशन कार्ड नसल्याने, सरकारने कडून मिळणारे धान्य देखील घेता येत नाही. त्यामुळे जगावे कसे, हा खूप मोठा प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाला आहे. 


नमिता सारख्या अश्या अनेक महिला आहेत, ज्या बिकट परिस्थितीमुळे या व्यवसायाकडे वळल्या आहेत. ज्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आज कोरोनामुळे निर्माण झाला आहे. 


महिला व बालविकास मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात दश लक्ष वेश्या व्यवसाय आहेत. आणि लॉकडाऊन मुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दिल्लीतील एक वेश्याचे म्हणणे आहे की, लवकरच या लॉकडाऊन मुळे आम्ही आणि आमची मुले उपासमारीला बळी पडणार आहोत. 


देशात देह विक्रीचा व्यापार करणार्‍या या महिलांची संख्या भरपूर आहे. पण शासकीय मदतीच्या योजनांमधे त्यांचा जास्त समावेश नसतो. त्यामुळे त्या शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून त्या वंचित राहतात. तेव्हा शासनाकडून यांना मदतीचा हात पुढे करण्यात यावा, एवढीच यांची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments