Ticker

6/recent/ticker-posts

उच्या भावाने खते विक्री कराल तर याद राखा- प्रविण डिक्करकेंद्र शासनाने नाही तर व्यापाऱ्यांनी वाढवले खतांचे भाव


विरोधक नाहक बदनामी करण्याचे राजकारण करत आहेत


तालुका कृषी अधिकारी व कृषी सेवा केंद्रांच्या मालकांशी केली युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी चर्चा


चढ्या भावाने विक्री करणाऱ्या विक्रेत्या विरोधात कारवाई करण्याचे दिले कृषी अधिकाऱ्यांनी आश्वासन 


अकोट-काही खत उत्पादक कंपन्यांनी दरवाढ केल्याच्या बातम्या विविध माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर केंद्र शासनाने आपली भूमिका स्पष्ट करत असे कुठलेच दरवाढ करण्या संदर्भात निर्णय झाला नसून याबाबत पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय रसायने व खते विभागाचे राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी खत उत्पादकांसोबत बैठक घेऊन जाहीर केलं. 

या बातमीची दखल घेत आज भाजयुमो अकोट तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील कृषी सेवा संचालकांची व कृषी अधिकाऱ्यांची भेट घेत विचारणा केली असता अशी कुठलीच दरवाढ झालेली नसून शेतकरी जुन्याच भावात खत विकत घेत असल्याचे निदर्शनास आले. 

विरोधक केंद्र सरकारची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने फक्त राजकारण करणयासाठी या विरोधात खोट्या अफवा पसरवत असून सामान्य शेतकऱ्यांनी या गोष्टींवर विश्वास न ठेवता जुन्याच दारात खत खरेदी करावे चढ्या भावाने कोणी कृषी सेवा संचालक विक्री करत असेल त्याच्या विरोधात तक्रार करवी तक्रार झालेल्या संचालका विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन कृषी अधिकाऱ्यांनी दिले आहे. 

शेतकऱ्यांना विकल्या जाणाऱ्या सध्याच्या खतांबाबत नव्या दराचा संबंध नाही शेतकऱ्यांसाठी विक्री होणाऱ्या खतांच्या भाव वाढीचे कुठले ही पत्रक शासनाने काढले नाही ही दरवाढ व्यापाऱ्यांनी केली असून ती सुद्धा सोशल मीडियावर फिरणाऱ्या दरवाढीच्या पात्रामुळे करण्यात आली आहे आणि कोणत्याच दुकानदाराकडे किंवा कृषी विभागाकडे दरवाढीबाबत कुठलेच शासकीय पत्रक नसल्याने जुन्याच दराने खरेदी करणे बंधनकारक आहे. 

सोशल मीडिया वर खोटी अफवा पसरवून गरीब सामान्य शेतकऱ्यांना नाहक वेठीस धरणाऱ्या व खोटी अफवा पसरावणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचीही मागणी यावेळी युवा मोर्चे ने केली आहे.आज भाजयुमो अकोट तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री खा.संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात व पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.रणधीरभाऊ सावरकर,अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे, तालुका अध्यक्ष कनकजी कोटक,भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिनबाप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकरी व खत विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या भेटी घेऊन दरवाढी बाबतची सत्यता जाणून घेत नागरिकांच्या समोर आली विरोधक फक्त राजकीय स्वार्थासाठी खोटी अफवा पसरवून केंद्रसरकरची प्रतिमा मलिन करण्याचं काम करते आहे असा आरोप युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस प्रवीण डिक्कर यांनी केला यावेळी युवा मोर्चा चे प्रवीण डीक्कर.  गोपाल मोहोळ  मंगेश ताडे . अजय खडसान  हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments