Ticker

6/recent/ticker-posts

परमबीर सिंह आणि प्रदीप शर्मावर नवा गंभीर आरोप.....वाचा सविस्तर

Parambir Singh


मुंबई | परमबीर सिंग आणि प्रदीप शर्मा यांच्यावर सुरू असलेल्या चौकशीत आता नवे सत्य उघडकीस आले आहे. व्यावसायिक असलेल्या मयुरेश राऊत यांनी त्यांच्या विरोधात गंंभीर आरोप केले आहेत.


कुठलीही तक्रार नसताना मला खंडणी विरोधी पथकात तीन दिवस डांबून ठेवून मारहाण केली गेली, असा आरोप व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी केला आहे. या आरोपात परमबीर सिंह यांच्यासह माजी पोलीस अधिकारी, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे आणि इतर पोलिसांचाही समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बाँम्बमुळे आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडे अनेकांची बोटे सरकली होती. आता मात्र परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 


पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मयुरेश राऊत यांनी पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी, पोलिसांनी 2017 मध्ये माझ्या घरात दरोडा टाकून माझ्या दोन गाड्या चोरी केल्या, असा दावा राऊत यांनी केला आहे. 


बेकायदेशीर पद्धतीने पोलिसांनी या गाड्या ताब्यात घेतल्या असून त्या गाड्यांचा वापर मनसुख हिरेन सारख्या प्रकरणात होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments