Ticker

6/recent/ticker-posts

वेळेत उपचार न मिळाल्याने NSG ग्रूप कमांडरचा मृत्यू




नवी दिल्ली | कोरोनामुळे दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढू लागल्याने वैद्यकीय सुविधा अपु-या पडू लागल्या आहेत. वेळीच ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, यांसारख्या सेवा न मिळाल्याने रूग्णाला आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. 


अश्यातच एका ब्लॅक कॅट कमांडोचा वेळेवर आयसीयु बेड न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. 


NSG ग्रूप कमांडर बिरेंद्र कुमार झा यांना कोरोनाची लागण झाल्याने 22 एप्रिल रोजी त्यांना अर्धसैनिक दलाच्या रेफरल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती ठीक होती. परंतू 4 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता अचानक वीरेंद्र कुमार झा यांची प्रकृती खालावली. 


नोएडाच्या रेफरल हॉस्पीटलमध्ये आयसीयू बेड उपलब्ध नसल्याने डाॅक्टरांनी त्यांना तात्काळ दुसऱ्या हॉस्पीटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. 


प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी दिल्लीतील अनेक हॉस्पीटल्समध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी चौकशी केल्या. परंतू कुठेही बेड उपलब्ध झाला नाही. 


शेवटी पर्याय उपलब्ध नसल्याने बिरेंद्र झा यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments