Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान आपल्याच देशातील तरूणांचा जीव धोक्यात टाकत आहेत?.....ममता बॅनर्जी

नव्या संसदेसाठी, पुतळ्यांसाठी 20 हजार कोटी आहेत मग लसीकरणाला 30 हजार कोटी का नाहीत?”



नवी दिल्ली |  कोरोनाच्या भिषण परिस्थितीतून देश अजूनही सावरला नाही, त्यामुळे त्यावर उपाय म्हणून असलेल्या लसीकरणासाठी प्रत्येक राज्याची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील सध्या सुरू असलेल्या कोरोना परिस्थितीबाबत राज्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. 


अनेक राज्यांनी कोरोना लस ही मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. देशहिताचा विचार करत ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्वांनाच कोरोनाची लस ही मोफत देण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.



परंतू मोफत लसीकरणाच्या या मागणीला पंतप्रधान मोदींकडून मला अद्याप कुठलंही उत्तर मिळालं नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नवीन संसद आणि पुतळे बांधण्यासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च करता येऊ शकतात, मग लसीकरणासाठी 30 हजार कोटी का देऊ शकत नाही ? असा संतप्त सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानाना केला आहे.


पंतप्रधान हे आपल्याच देशातील तरुणांचा जीव धोक्यात कसे घालू शकतात? त्यांचे नेते हे कोव्हिड हॉस्पिटलला भेट न देता, येथे येत आहेत. आणि येथे येऊन कोरोना पसरवत आहेत, अशी टीकाही ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments