Ticker

6/recent/ticker-posts

एका क्षणात जीव घेणारे किडे



निसर्गाने निर्माण केलेल्या सर्वच गोष्टी या मानवासाठी फायदेशीर ठरेलच असे नाही. जगाच्या पाठीवर कोट्यावधी जातींचे अनेक असे लहान मोठे जीव आहे, जे धोकादायी आहेत. या धोकादायक प्राण्यांमध्ये आपण सिंह, चीता, मगर, वाघ, यांसारखे अनेक प्राणी आहेत. जे मानवासाठी आणि इतर प्रण्यांसाठी घातक आहेत. 


परंतु या प्राण्यांसाठी देखील काही कीटक धोकादायक आहेत, ज्याबद्दल आज तुम्ही जाणून घेणार आहात. 


• प्रत्येकाच्या घरात कोळी आपले जाळे तयार करते. तिने तयार केलेले हे जाळे विषारी नसतात. परंतु तपकिरी रंगाची असलेली एका विशिष्ट जातीची कोळी अतिशय विषारी आहे. तिच्या तोंडात निरोटिक नावाचा एक हानिकारक घटक आढळतो, ज्यामुळे मानवी पेशी खराब होण्याचा धोका असतो. 


• काळ्या रंगाच्या मुंग्या आपणा सर्वांनी लहानपणापासून पाहिल्या असतील. काही गोड पदार्थ असला की त्या लगेच तिकडे धाव घेतात. अंगणात, घराच्या भिंती, अनेक ठिकाणी या दिसून येतात. कधीकधी काळी किंवा लाल रंगाची मुंगी माणसाला चावतात. परंतू त्यामुळे जास्त वेदना होत नाहीत. परंतु या मुंग्यांची अशी एक प्रजाती आहे, जीच्या चाव्याव्दारे असह्य वेदना होतात. ती म्हणजे बुलेट मुंगी. ही चावल्यास 24 तास खूप असह्य वेदना होते. 


• याहून सर्वात धोकादायक किटक म्हणजे ब्लॅक विडो स्पायडर. या प्रकारच्या कोळीमुळे असह्य वेदना तर होतेच परंतू या वेदनांमुळे मृत्यू होण्याची शक्यता देखील असते.


• मकोराची सर्वात धोकादायक प्रजाती म्हणजे बोट फ्लाय कीटक. हा किडा सर्वात धोकादायक मानल्या जाते. कारण ते मानवी शरीरात लहान छिद्र करून आत शिरते. हा किडा मानवाचे मांस खाऊन शरिरात 2 महिन्यांपर्यंत जिवंत राहतो, या धोकादायक कीटकांमुळे देखील माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

Post a Comment

0 Comments