Ticker

6/recent/ticker-posts

'भारती' वार्षिकांकाला सलग दोनदा प्रथम पारितोषिक



अमरावती-  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित भारतीय विद्यामंदिर अमरावती द्वारा संचालित भारतीय महाविद्यालयाच्या 'भारती' वार्षिकांकाला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या  2028-19 आणि 2019-20 च्या वार्षिकांक स्पर्धैत सलग दोनही वर्षी प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. 1 मे 2020  रोजी ही दोन्ही पारितोषिके देऊन महाविद्यालयाला सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाला विद्यापीठाद्वारे सलग दोनदा प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.

                       या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मुरलीधर चांदेकर कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती,प्रमुख उपस्थिती डॉ. राजेश जयपुरकर प्र-कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. डॉ तुषार देशमुख , कुलसचिव, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या उपस्थितीत आभासी पद्धतीने वार्षिकांक पारितोषिकाचे वितरण करून सन्मानित करण्यात आले.
                          भारतीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आराधना वैद्य याच्या नेतृत्वामध्ये  " भारती वार्षिकांक " प्रकाशित झाला.
              या वार्षिकांच्या मुख्य संपादक डॉ. अलका गायकवाड होत्या.   डॉ. विजय भांगे,  डॉ. मीता कांबळे,  डॉ. प्रशांत विघे ,प्रा.स्नेहा जोशी प्रा. पंडित काळे यांनी संपादक मंडळात कार्य केले.
            तर विद्यार्थी संपादक मंडळात अजिंक्य मेटकर प्रियंका गोळंबे, सुमेध वानखडे, तन्वी मोहरील,नगमा फरहीन मिर्जा अंसार बेग,रूपेश आडे,दिव्या नानोटी,निकीता  बारसाकडे,अभिजित ठाकरे यांचा समावेश होता या सर्वांनी कार्य केलेले आहे .
                          भारतीय महाविद्यालयाद्वारे  दरवर्षी नवीन संकल्पना अंकाच्या केंद्रस्थानी ठेवून वार्षिकांक प्रकाशित केला जातो.2018-19 या अंकाची संकल्पना 'नारीशक्ती'ही होती.स्त्रीची भरारी,अस्तित्त्वासाठीचा तिचा संघर्ष याची दखल घेऊन ऑक्सफोर्ड  डिक्शनरीने यावर्षी 'नारीशक्ती'  हा शब्द हिंदी वर्ड ऑफ  द ईअर..सर्वोच्च शब्द म्हणून निवडला.बहुमान मिळालेल्या शब्दाची दखल घेत या अंकाला साकार केले होते.तर 2019-20 या अंकाची संकल्पना 'गांधी विचार दर्शन'ही होती.कोवीड -19  या महामारीशी सामना करण्याची ताकद गांधी विचारधारेत आहे. स्वच्छता,आरोग्य,सकारात्मकता या विचारासोबतच खेड्याकडे चला,निसर्ग जपा हा गांधीजींचा मंत्र या परिस्थितीत महत्त्वाचा ठरतो.ही निकड लक्षात घेऊन हा अंक साकार करण्यात आला होता.
               या संपूर्ण कार्यासाठी भारतीय विद्या मंदिराचे अध्यक्ष डाॅ. रमेश बिजवे व सर्व कार्यकारिणी यांचे पाठबळ या अंकाला लाभले होते.
            महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आराधना वैद्य त्यांच्या नेतृत्वामध्ये  सातत्याने महाविद्यालयाचा यशाचा आलेख उंचावतो आहे. अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होते आहे.

Post a Comment

0 Comments