Ticker

6/recent/ticker-posts

रेमडीसीव्हीरसाठी संवाद आंदोलन

रुग्नांसह,नातेवाईकांची हेळसांड व आर्थीक लुट थांबवण्याची केली मागणी
रुग्न नातेवाईकांना रेमडीसीव्हीर मिळाल्याने आंदोलन स्थगीत  



चिखली- मनोज जाधव -  शहरातील हॉस्पिटलला बऱ्याच अंशी सुरळीतपणे रेमडीसीव्हीर इंजेक्शन उपलब्ध होत आहेत,परंतु ज्या कोव्हिडं हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन पुरेश्या प्रमाणात उपलब्ध असतांना देखील त्याच हॉस्पिटलच्या रुगणांना  रेमडीसीव्हीर  इंजेक्शन मिळत नसल्याची माहिती रुग्न नातेवाईकांनी चिखलीतील सामाजीक कार्यात अग्रेसर असणार्या विविध पक्ष संघटनेतील कार्यकरत्यांना दिल्याने दि 30 एप्रिल रोजी अन्न व औषध प्रशासन कार्यालयात विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रुगन्ना रेमडिसिव्हीयर इंजेक्शन मिळावे,रेमडीसीव्हीर  इंजेक्शनसाठी होणारी लुट थांबवावी, जे मेडीकल धारक स्वतः कँम्पणीकडुन इंजेक्शन उपलब्ध करतात त्यांना प्रशासनाने त्रास देऊ नये.

 इतर हॉस्पीटल,मेडीकलला इंजेक्शन उपलब्ध करण्याबाबत सुचना कराव्यात व मुबलक प्रमाणात रेमडीसीव्हीर साठा उपलब्ध करण्यात यावा,या सर्व प्रकारावर रोख म्हणुन नियंत्रण समिती गठीत करावी,कोव्हिडं व्यतिरिक्त इतर पर्यायी मेडीकल वर ही रेमडिसिव्हीयर इंजेक्शन उपलब्ध करावेत यासह आदि मागण्या घेऊन संवाद आंदोलन करण्यात आले आहे.

या आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील,नगरसेवक तथा माजी पाणी पुरवठा सभापती गोविंद देव्हडे,डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सदस्य विनायक सरनाईक,युवासेना तालुका प्रमुख नंदू कऱ्हाडे,माजी शिक्षण सभापती तथा शिवसेना नगरसेवक दत्ता सुसर,बुलढाणा नगरपालिकेचे नगरसेवक मोहन पऱ्हाड, स्वाभिमानीचे  मा.जिल्हा सरचिटणीस नितीन राजपूत,वीर मराठा मावळ संघटनेचे विदर्भाध्यक्ष उमेश इंगळे पाटील,स्वाभिमानी चे संदीप मुळे, रयतचे तुषार काचकुरे यांच्यासह कोरोना रुघ्नांच्या नातेवाईक उपस्थीत होते,

जिल्हाभरात रेमडीसीव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे,रुग्न नातेवाईक रेमडीसीव्हीर साठी अन्न व औषध विभागाकडे वारंवार चकरा मारत आहेत परंतु तरी सुद्धा रेमडीसीव्हीर इंजेक्शन मिळत नसल्याची परीस्थीती आहे. 

तर दुसरीकडे मात्र डॉक्टरांकडुन  कागदपत्रे रुग्न नातेवाईकांच्या हाती देऊन बाहेर इंजेक्शन घेऊन येण्याचे सल्ले दिले जात असल्याने इंजेक्शनचा पुरेसा साठा मिळुनही रुग्न नातेवाईकांची हेळसांड होत असल्याची बाब हेरुण रुग्न नातेवाईकांसह बुलढाणा औषध प्रशासन कार्यालयात पाच तास ठिय्या देऊन अधिकार्याशी संवाद साधत आंदोलन करण्यात आले आहे. 

या आंदोलनात सकरात्मक चर्चा होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते, रूग्नांचे नातेवाईक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले दरम्याण रुग्न नातेवाईक यांच्याकडुन बुलढाणा येथील रुग्न नातेवाईकांना रेमडीसीव्हीर मिळाले रुघ्नांचे होणारे हाल बघता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोव्हिडं हॉस्पिटल व्यतिरिक्त इतर मेडीकलला देखील कोरोनासाठी लागणाऱ्या औषध विक्रीची परवानगी दयावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली  आंदोलनकर्ते यांनी रुग्नांना,रुग्न नातेवाईकांना भेडसावणार्या समस्यांचा पाढा अधिकार्यासमोर वाचल्याने मागण्यांच्या कारवाई बाबतचे अश्वासन देत या अनुषंघाने जिल्हाधिकारी यांना पत्राव्दारे कळविण्यात आले आहे,आंदोलन कर्त्यांशी सकारात्मक प्रतिसाद देत संवादातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक गजानन घिरके यांनी केला.

 परंतु यावेळी एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने जबाबदारी झटकत याविषयी जिल्हाधिकारी यांच्याकडे जा आमच्या कार्यालयाचा याच्याशी काहीही संबध नसल्याचे सांगितले असता आंदोलन कर्ते संतप्त झाले व  काहीकाळ तणावग्रस्त वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला परंतु आंदोलन  कर्ते यांची आक्रमकता  व विषयाचे गांभीर्य बघता तात्काळ त्या ठिकाणी शिवसेना आमदार संजय गायकवाड आले व त्यांनी आंदोलन कर्त्यांना शांत करत त्यांची बाजू अन्न व औषध प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडली यावेळी प्रशांत ढोरे पाटील व विनायक सरनाईक यांनी आलेल्या विविध  प्रसारमाध्यमांनसमोर रुघ्नांच्या अडचणी व्यक्त करत असंख्य रुघ्नांच्या नातेवाईकांना दिलासा दिला.

Post a Comment

0 Comments