Ticker

6/recent/ticker-posts

गरिबीशी तडजोड करून गाठला आमदारकीचा प्रवास


मनात जिद्द असली की मजुराची पत्नी ही आमदार होऊ शकते........



नवी दिल्ली | नुकत्याच लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत चंदना बावरी ही महिला आमदार झाली आहे.


एका गरीब कुटुंबातील आणि रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या मजुराची पत्नी आमदार झाल्याने अल्पावधीतच ही महिला आमदार लोकप्रिय झाली आहे. देशभरातून तीच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


मनरेगा श्रमिक भाजप उमेदवार चंदना बावरी ही महिला पश्चिम बंगालमधील सलोतरा येथे रहिवासी आहे. एका झोपडीत राहणाऱ्या चंदना यांच्या संपत्तीचा विचार करता त्यात एक गाय, तीन बकरी, एक झोपडी ऐवढीच त्यांची संपत्ती आहे. तृणमूल काँग्रेसच्या संतोषकुमार मंडल यांचा 4000 मतांनी पराभव करत चंदना यांनी आमदारकीचे यशोशिखर गाठले आहे. 


देशातील पाच राज्यांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यातील कोरोनाकाळात प्रचारासाठी वादग्रस्त ठरलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सर्वांची नजर होती. यामध्ये मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला सत्ता राखण्यात यश आलं आहे. 


मनात लढण्याची जिद्द असली की गरीब व्यक्तीलाही लढता येतं, हेच चंदना बावरी यांनी सिद्ध केले आहे.

Post a Comment

0 Comments