Ticker

6/recent/ticker-posts

हनीमूनच्या रात्री नवरी निघून गेली माहेरी....




नवी दिल्ली | एका तरूणाला लग्नाच्या पहिल्या रात्री खोकला आला. तो खोकला हे बघून नवरी मुलगी घाबरली आणि थेट माहेरी निघून गेली. असं ऐकून कुणालाही विश्वास बसणार नाही. पण ही कल्पनेतील कथा नसून वास्तव आयुष्यात घडलेला धक्कादायक प्रकार आहे. 


ही घटना झारखंडमध्ये घडली असून या घटनेची गावात सर्वत्र चर्चा होत आहे. धनबाद जिल्ह्यातील टुंडीजवळ असलेल्या बेगनोरिया गावातील तरूणाचे बरवाअड्डा जवळ असलेल्या एका गावातील तरूणीशी 30 एप्रिलला लग्न झाले. 


लग्नाच्या दुसऱ्या दिवशीही सर्व काही सुरळीत चाललं होतं. विवाह बंधनात अडकलेल्या जोडप्याच्या आयुष्यातील सुंदर क्षण असलेल्या हनीमूनच्या रात्री नवरदेव आपल्या बेडरूम मध्ये गेला. 


दोघेही एकमेकांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाल्याने आनंदी होते. परंतू अचानक नवरदेवाला खोकला आला आणि तो जोरात खोकलु लागला. मात्र त्याच्या या खोकल्याने नवरी मुलगी चांगलीच घाबरली.


ती टॉयलेटला जाण्यासाठी बेडरूम मधून बाहेर आली. नवरदेव इकडे नवरीची आतुरतेने वाट बघू लागला. बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने चिंतेने व्याकुळ नवरदेवाने नवरीची शोधाशोध सुरू केली.


काही वेळानंतर मात्र नवरी आपल्या माहेरी तिच्या भावासोबत निघून गेल्याचे समजले. वास्तविक पाहता लग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या घरातील लोकांना ताप होता. त्यामुळे त्या सर्वांनी आपली कोराना चाचणी केली होती. पण रिपोर्ट मात्र आलेली नव्हती. त्यामुळे लग्नानंतर नवरी घरी आल्यावर त्यांनी तिला, आम्ही सर्वजण कोरोना संक्रमित निघालो तर जवळच्या कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन व्हावं लागेल असे सांगितले होते.


नवरी मुलगी मात्र जास्तच गोंधळून गेली. त्यामुळे नवऱ्याच्या खोकल्याला घाबरून कोरोनाच्या भीतीने ती माहेरी निघून गेली. दैनिक जागरण मध्ये या वृत्ताचा उल्लेख आहे.


Post a Comment

0 Comments