अहमदनगर | विज्ञानाच्या या युगात आज माणूस अंतराळात पोहोचला. शिक्षणाने त्याची प्रगती झाली. पण अंधश्रद्धा मात्र पूर्णतः दूर झाली नाही. काही लोक अजूनही बुवाबाजी, अंधश्रद्धधेला बळी पडून स्वतःचे नुकसान करून घेतात. याच अंधश्रद्धेतून एका महिलेवर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.
संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक गावातील एक महिला या अत्याचाराची बळी ठरली आहे. या महिलेची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. परंतू डॉक्टरांकडून योग्य उपचार घेण्याचे टाळून ही महिला सावित्रा गडाख नावाच्या भोंदूबाबाकडे गेली.
त्याने या महिलेला कुणीतरी तुझ्यावर भूतबाधा केली आहे, तुझ्या अंगातले भूत उतरवावं लागेल, असं सांगितलं. बाबावर विश्वास ठेवून महिला त्याच्या जाळ्यात ओढल्या गेली.
भुत अंगातून बाहेर काढण्यासाठी या मांत्रिकाने महिलेला बळजबरीने दारू पाजली आणि तिला शेतात घेऊन गेला. तिथे त्याने नशेत असलेल्या या महिलेवर अत्याचार केला. या प्रकारानंतर लगेचच या महिलेने पोलिसांकडे धाव घेत, आपबीती सांगितली.
त्यामुळे मांत्रिकाविरोधात संगमनेर पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून मांत्रिकाला अटक केली. या माहितीबाबत न्यूज 18 लोकमतने वृत्त दिलं आहे.
0 Comments