Ticker

6/recent/ticker-posts

बच्चू कडू यांची पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांवर जोरदार टिका



मुंबई | मागील वर्षापासून उद्भवलेली कोरोनाची परिस्थिती ही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वैद्यकीय सुविधा, आरोग्य सेवक देखील अपुरे पडू लागले आहे. उद्भवलेल्या संकटाचे नियोजन हे योग्य प्रकारे केले नसल्याने कोरोनाचा आणि मृत्यूचा हा आलेख वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली आहे.


देशात योग्यवेळी योग्य नियोजन झाले असते तर, कदाचित आज ही परिस्थिती बघायला मिळाली नसती. पंतप्रधान म्हणून ज्या भूमिका नरेंद्र मोदी यांनी हाताळायला हव्या होत्या, त्यांनी त्या हाताळल्या नाहीत. त्यामुळे सर्वजण या भिषण संकटात सापडले आहे, असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधतांना ते म्हणाले, महाराष्ट्रात राहून राज्य सरकारवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा, ते केंद्रातून काय आणू शकतात याचा विचार त्यांनी करायला हवा. 


फडणवीस हे भाजपचे प्रमुख आहेत, पण तरी देखील ते मोदींकडे गेले का? आमच्या राज्याला लसीकरण जास्त द्या किंवा इतर सुविधा उपलब्ध करून द्या, असं एक तरी निवेदन त्यांनी पंतप्रधानांना दिले आहे का? अशी टीका बच्चू कडू यांनी यावेळी केली आहे.


इतर राज्यांच्या तुलनेत, आपल्या राज्यात केंद्र सरकार हे जरी दुजाभाव करत असले, तरी राज्य मात्र खंबीर आहे. हे त्यांनी लक्षात घ्यावे. मुंबईचं तर जागतिक पातळीवर कौतुक होतं आहे. आणि राज्याची स्थिती बरी आहे, असंही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments