Ticker

6/recent/ticker-posts

मुलाच्या मृत्यूने संतप्त झालेल्या जवानाने दिला सिस्टीमला दोष....असं काय घडलं

मुलाच्या मृत्यूने संतप्त झालेल्या जवानाने दिला सिस्टीमला दोष


नवी दिल्ली | कोरोनाने अनेकांना बेघर केले, अनेकांचे रोजगार गेले, अनेकांचे आप्तेष्ठ हिरावून घेतले. मृत्यूच्या रांगाच रांगा पाहून आधीच मन सुन्न झाले आहे. अश्यातच आणखी एक दुःखद घटना अनेकांचे काळीज भावूक करून गेली आहे. देशासाठी स्वतःचे सर्वस्व पणाला लावणारे कारगिल युद्धातील नायक सुभेदार मेजर हरी राम दुबे यांना कोरोनामुळे आपला मुलगा गमवावा लागला आहे. आपल्या मुलाचा मृतदेह पाहण्यासाठी देखील कित्येक तास त्यांना वाट पहावी लागली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


1981 ते 2011 पर्यंत मी आपल्या देशाची सेवा केली. कारगिल ते बारामुल्ला, लडाख ते लुकुंग येथे मी कर्तव्य बजावलं. मी बारामुल्ला येथे दहशतवाद्यांना ठार केलं आणि कारगिलमध्ये पाकिस्तानविरोधात लढा दिला. पण दुर्दैव असं की, ही सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही, आणि आता कागदपत्रांसाठी ते मला पळवत आहेत. ही वागणूक म्हणजे छळ आहे, असं सांगत मेजर हरी राम दुबे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे.


मुलाचा मतदेह पाहण्यासाठी आपली पत्नी, मुलगी आणि सुनेसोबत कित्येक तास वाट पहावी लागली. नंतर अखेर कुटुंबाला पीपीई किट घालून मृतदेह पाहण्याची परवानगी देण्यात आली. ही बाब खरंच असंवेदनात्मक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments