Ticker

6/recent/ticker-posts

बोर नदीवर पुन्हा अपघात



अमरावती संतोष शेंडे

अमरावती ते बोराळा मार्ग चांदूर बाजार मार्गावर असलेल्या अरुंद बोर नदीवरील पुलावरून अमरावतीकडे येणारा मिनीडोर बांधकाम विभागाच्या नियोजनाअभावी नदीत कोसळून चालक गंभीर झाल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली, या पुलावर यापूर्वीदेखील अनेक अपघात झाले असून अनेकांचे बळी गेले आहेत याबाबतची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली होती परंतु अद्यापही कोणत्या प्रकारची कारवाई न झाल्याने आज या पुलावर पुन्हा अपघाताची पुनरघटना घडली आहे.



अमरावती ते चांदुर बाजार बोराळा शिराळा मार्गावर रस्त्याचे बांधकाम रुंदीकरणासह पूर्ण झालेले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, शिवाय रस्ता रुंद झाल्याने व डांबरीकरण झाल्याने या रस्त्यावरील वाहनांची गती देखील वाढली आहे. परंतु या मार्गावरील नदीचा पूल या रस्त्यावरील वाहनांकरिता अडथळा ठरत आहे. दोन वर्षांपूर्वी बोर नदीवरील व पेढी नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यात आले असून ते पूल सरळ न बांधता नागमोडी मार्ग काढण्यात आला आहे. त्यामुळे दोन वर्षात याच पुलावर अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत, कित्येक अपघातात जीवितहानी देखील झालेली आहे,
 डिसेंबर मध्ये पुन्हा बोरी नदीच्या पुलावर संत्राचा ट्रक उलटला होता. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, परंतु त्यानंतर लगेच तिसऱ्याच दिवशी याच पुलावर मोटारसायकल अपघातात जीवित हानी झाली होती, 
आतापर्यंत  विविध गाड्यांचा अपघात या ठिकाणी झालेले आहेत. या रस्त्याचे तथा पुलाचे बांधकाम करताना बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारचे नियोजन न केल्यानेच अपघात होत असल्याची तक्रार बेसखेडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विजय गोहत्रे यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली होती.तसेच याबाबत विविध वृतपत्रात वृत्त देखील प्रकाशित करण्यात आले होते.
 परंतु अद्यापही या पुलावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा न दिल्याने अखेर आज मंगळवारी दुपारी बारा वाजता शिराळा येथून अमरावती कडे येणारा मिनीडोअर स्पीड ब्रेकर वरून थेट बोरी नदीत कोसळला यामध्ये  चालक मिनीडोर खाली दबून गंभीर जखमी झाला ,याची माहिती तात्काळ वलगाव पोलिसांना देण्यात आली, पोलिसांनी घटनास्थळ गाठून  जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे ,प्रकृती नाजूक असल्याने त्याचे नाव पत्ता अद्याप करू शकला नाही,
 
या पुलावरील बांधकामाची चौकशीही थंडबस्त्यात
या मार्गाचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण झालेले आहे परंतु बोर नदी व पेढि नदी या दोन्ही पुलाची रुंदी कमी असल्याने मात्र या ठिकाणी सतत अपघात होत आहे, त्यामुळे याबाबतची तक्रार  विजय गोहत्रे यांनी  बांधकाम विभागाकडे केली होती  ,या तक्रारीची दखल घेत  विशेष अधिक्षक मु.प्र. देशपांडे यांनी अधिक्षक अभियंत्यांना पत्र देवुन तक्रारीच्या अनुषांगाने चौकशी करून त्याचा अहवाल तत्काळ सादर  करण्याचे आदेश दिले आहे. परंतु गत चार महिन्यापासून ही चौकशी थंडबस्त्यात पडलेली आहे.

Post a Comment

0 Comments