Ticker

6/recent/ticker-posts

एम्सच्या संचालकांचा सिटी स्कॅन बाबत महत्वाचा सल्ला.... वाचा सविस्तर

Randeep Guleria


नवी दिल्ली | आरटी-पीसीआर टेस्टमध्ये कोरोनाचं निदान न झाल्याने, सिटी स्कॅनद्वारे त्याचे निदान केल्या जात आहे. त्यामुळे अनेक जण सीटी स्कॅन करून खात्री करून घेत आहेत. 


मात्र आरोग्याची स्थीती जास्त बिकट नसतांना सिटी स्कॅन करणं महागात पडू शकतं, असा इशारा एम्सच्या डॉक्टरांनी दिला आहे.


सोमवारी आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत सिटी स्कॅन हे विचारपूर्वक करायला हवं, असं मत एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलं आहे. पुढे ते म्हणाले, सौम्य लक्षणं असलेले रुग्ण हे कोणत्याही औषधांशिवाय बरे होऊ शकतात. त्यामुळे कोरोनाच्या सौम्य लक्षणांमध्ये सिटी स्कॅन करू नये, असंही ते म्हणाले. 


सीटी स्कॅन हे शरीरासाठी अत्यंत हानिकारक असून ते तीनशे छातीच्या एक्स-रेच्या समतुल्य आहे. कोरोनामुळे घरात विलगीकरणात राहणारे व्यक्ती ज्यांचे सॅच्युरेशन 93 किंवा त्याहून कमी होत आहे, अशक्तपणा जाणवत आहे, छातीत सारखं दुखत आहे, अश्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या संपर्कात रहावे, असंही रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments