Ticker

6/recent/ticker-posts

श्रीरामपूरच्या शिवप्रेमीने अंगणातच उभारले राजमाता जिजाऊ व शिवरायांचे शिल्प!


 

मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण

श्रीरामपूर- सिंदखेड राजा येथे सार्वजनिक जिजाऊ जन्मोत्सवाला जाता येणार नसल्याने श्रीरामपूरातील  शिवप्रेमीने चक्क घराच्या अंगणात राजमाता जिजाऊ व बालशिवरायांचे शिल्प उभारले. जिजाऊ जयंतीला मंगळवारी (ता.१२) मान्यवरांच्या उपस्थितीत शिल्पाचे लोकार्पण करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड.आप्पाराव मैंद हे होते.प्रमुख अतिथी म्हणून पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद,शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव अनिरुद्ध पाटील,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख,डाॅ.मोहम्मद नदीम,डाॅ.पंकज जयस्वाल,शेख कय्युम,डाॅ.शैलेंद्र नवथळे,नगर परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.किरण सुकलवाड,दत्तात्रेय जाधव,शांताबाई जाधव,संतोष जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. अॅड.आप्पाराव मैंद,दत्तात्रेय जाधव,शांताबाई जाधव,संतोष जाधव यांनी पुतळ्याचे पूजन करुन लोकार्पण केले.यावेळी उपस्थितांनी "जय जिजाऊ,जय शिवराय" या घोषणा दिल्या.यानंतर मान्यवरांनी युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद व मानवतेचे पूजारी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले.महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवरायांना घडविण्याचे महत्तकार्य राजमाता जिजाऊंनी केले.शिवरायांनीही राजमाता जिजाऊंनी पाहिलेल्या स्वप्नाला सत्त्यात उतरविण्यासाठी बालपणापासूनच आपल्या अलौकिक,अविश्र्वसनिय शौर्य,पराक्रम,बुद्धीमत्ता,चातुर्य,गणिमी कावा आणि धाडसी मावळ्यांच्या  विश्र्वासावर स्वराज्य निर्माण केले व रयतेला सुखी केले.

सकल  जणांना  आदर्श माता व आदर्श पुत्र यांचे स्मरण व्हावे या उदात्त हेतूने तसेच १२ जानेवारीला सिंदखेड राजा येथे सार्वजनिक जिजाऊ जन्मोत्सवाला जाता येणार नसल्याने  माणूसकीची भिंतचे अध्यक्ष  गजानन जाधव ह्या शिवप्रेमीने स्वत:च्या घरासमोरील अंगणात स्वखर्चाने तब्बल साडेपाच फुट ऊंचीच्या राजमाता जिजाऊ व तीन फुट उंचीच्या बालराज्यांचे सामुहिक शिल्प निंबी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार मुरलीधर ढगे  व बाल कलाकार मानव भारत ढगे यांनी अहोरात्र मेहनतीतून साकारुन जाधव बागेत उभारले.  

कार्यक्रमाला प्रभाकर टेटर, नितीन पवार जय जाधव जीवा जाधव शिला जाधव  आदित्य जाधव सुशांत  महल्ले,दीपक काळे,सुधाकर सरकचौरे,पत्रकार उत्तम वानखेडे,शशिकांत जामगडे,गिरीधर ठेंगे,प्रदीप नरवाडे,संजीव सोनी,अनंता महाराज कनवाळे,अभिजित पानपट्टे,करण ढेकळे,हरिभाऊ ठाकरे,प्रवीण कदम,गणेश पावडे,पुरुषोत्तम डुब्बेवार,गिरीश अनंतवार,सोहम नरवाडे,गोपाल सुरोशे,कुलदिप गावंडे,जिजाऊ ब्रिगेडच्या शुभांगी पानपट्टे,सुनंदा वांझाळ,छाया लामणे,प्रा.संध्या कदम,मंदा इंगोले,वर्षा आसोले,पल्लवी देशमुख,उज्वला खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात आसावरी पवार हिने जिजाऊ वंदनेने केली.यावेळी नागरे कुटुंबियातील चिमुकल्यांनी जमविलेल्या खाऊच्या पैशातून माणूसकीच्या भिंतीला ३१ सतरंज्या तर जिजाऊ ब्रिगेडतर्फे ३० ब्लँकेट्स भेट दिले. यावेळी शिल्पकार मुरलीधर ढगे यांचा शरद मैंद व डाॅ.किरण सुकलवाड यांनी शाल,श्रीफळ देऊन  सत्कार केला.बाळकृष्ण बिडवई यांनी शिल्पकलेवर प्रसन्न होऊन शिल्पकार यांना रोख पारितोषिक दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चंद्रकांत ठेंगे यांनी केले.प्रास्ताविक सत्यपाल महाराजांचे शिष्य व समाज प्रबोधक पंकज पाल महाराज यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माणूसकीची भींतच्या पुरुष व महिला सदस्यांनी पुढाकार घेतला. यावेळेस गजानन जाधव यांनी मूर्तीच्या दर्शनास येण्याचे सर्व शिवप्रेमींना आव्हान केले

विदर्भदूत साठी ,जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments