Ticker

6/recent/ticker-posts

मृत शेतकऱ्याच्या पत्नीला मदतीचा हात



भातकुली तालुका मराठी पत्रकार संघाचा उपक्रम

अंगावर वीज पडून दुर्दैवी अंत झालेल्या मृत शेतकऱ्याच्या पत्नीला सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या अनुषंगाने भातकुली तालुका मराठी पत्रकार संघाने साडीचोळी आणि जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करून मदतीचा हात दिला आहे. विशेष म्हणजे पतीचा मृत्यू झाल्यानंतर शासनाकडून विविध योजनांखाली मदत मिळवून देण्यासाठी तालुका पत्रकार संघाने विशेष प्रयत्न देखील केले आहेत. 

          दोन लहान मुले आणि तारूण्याच्या वयात निसर्गाच्या अवकृपेमुळे सोडून गेलेला पती अशात कुणाकडूनही मदतीची अपेक्षा नसताना भातकुली तालुका पत्रकार संघाने मात्र टाकरखेडा संभू येथील मृत शेतकरी मनोज गोपाल कोठार यांच्या विधवा पत्नी शीतल मनोज कोठार यांच्यावर आता दोन लहान मुले आणि त्यांच्या वडिलांची एकूण जबाबदारी आली आहे. घरात शेती नसताना केवळ लागवणीने शेती करून त्यातून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविणारे शेतकरी असलेले मनोज कोठार यांचा १६ ऑक्टोबर रोजी शेतात काम करण्याकरिता गेले असताना अंगावर वीज पडून दुर्देवी अंत झाला होता. त्यांचा मृत्यू नैसर्गिक हानीमुळे झाला असताना भातकुली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष शेंडे यांनी पुढाकार घेऊन त्यांना शासकीय मदत मिळवून दिली. यासोबतच पत्रकार दिनाच्या निमित्ताने कुठलाही कार्यक्रम न घेता पत्रकार संघाच्या वतीने मनोज कोठार यांच्या पत्नी शीतल कोठार यांना साडीचोळी तसेच जीवनावश्यक साहित्य भेट देऊन त्यांना मदतीचा हात दिला आहे. यावेळी युवक बिरादरीचे शहराध्यक्ष प्रदीप चौधरी, अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष संजय बनारसे, प्रसिद्धी प्रमुख गौरव इंगळे, भातकुली तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष शेंडे, निलेश जामठे आदींची उपस्थिती होती. यावेळी शीतल कोठार यांच्यासह मनोज कोठार यांचे वडिल गोपाल कोठार तसेच बिट्टू आणि गोपी अशी दोन्ही लहान मुले देखील उपस्थित होती. यावेळी पत्रकार संघाने कोठार कुटंबिंयांचे सांत्वन करून त्यांना कुठल्याही वेळी मदतीची अपेक्षा असल्याने सहकार्य करण्याचा विश्वास कोठार कुटुंबियांना दिला. 

             दरवर्षी मोठ्या उत्साहात भातकुली तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. मात्र यंदा तालुकाध्यक्ष संतोष शेंडे यांनी सामाजिक भावनेतून हा उपक्रम आयोजित करून शेतकऱ्याच्या कुटूंबाला आधार दिला आहे.

अमरावती जिल्हा प्रतिनिधी संतोष शेंडे

Post a Comment

0 Comments