चिखली : गेल्या सात वर्षांपासून शेतकरी, विध्यार्थी, सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले गांगलगाव येथील उच्चशिक्षित युवा नेतृत्व ऋषिकेश म्हस्के यांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून २२ जानेवारी रोजी बुलडाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.
चिखली तालुक्यातील गांगलगाव येथील ऋषिकेश म्हस्के यांचे Bsc (Agri), बायोटेक्नॉलॉजीपर्यंत शिक्षण झालेले आहे. उच्चशिक्षित असल्याने कृषी क्षेत्रातील कुठल्याही मोठ्या कंपनीत त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती. मात्र नोकरीच्या मागे न लागता त्यांनी स्वतःला शेतकरी चळवळीत झोकून दिले. शेतकरी कर्जमाफी, पीककर्ज, नुकसान भरपाई यासह इतर मुद्द्यांवर विविध आंदोलने केली. शेतकरी योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. रास्ता रोको, निदर्शन, धरणे, उपोषण यामाध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. विद्यार्थी शिष्यवृत्ती, फीमाफी तसेच बेरोजगारी, महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खरी जाण आहे. तेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतात. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य न्याय देता येईल यासाठी २२ जानेवारी रोजी श्री. म्हस्के यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. आपले समर्थक, विध्यार्थी, युवक लवकरच मोठ्या संख्येने पक्षप्रवेश करतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राम पाटील खेडेकर, जि. प. सदस्य डी. एस. लहाने, गणेश बाहेकर, मयूर बाहेकर यांच्यासह मान्यवर हजर होते.
उच्चशिक्षित व शेतकरी चळवळीची जाण असलेले तरुण राजकारणात आल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागण्यास नक्कीच मदत होईल. आगामी काळात शेतकरी, युवक, विध्यार्थ्यांसाठी अधिक जोमाने काम करावे, हीच अपेक्षा.
- डॉ. राजेंद्र शिंगणे
पालकमंत्री, बुलडाणा
0 Comments