Ticker

6/recent/ticker-posts

“स्वागत स्त्री जन्माचे” अंतर्गत 773 व्या कन्यारत्नाचे स्वागत



 

राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती साजरी 

राजमाता जिजाऊ माँ साहेब व युवकांचे प्रेणास्थान स्वामी विवेकानंद जयंती यांच्या जयंती चे औचित्य साधून उमरखेड येथील उत्तरवार शासकीय कुटीर रुग्णालयात इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार प्राप्त जिव्हाळा संस्था, उमरखेड जि. यवतमाळ महाराष्ट्र राज्य  सामाजिक कार्यात नेहेमी अग्रेसर असणाऱ्या कमी कालावधी मध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या जिव्हाळा संस्थेने पिंपळदरी येथील अल्का जीवन बुरकुले या मातेला कन्यारत्न झाल्याची वार्ता उत्तरवार कुटीर रुग्णालयातील एम.एस. जोरगेवार अधिपरीचारक यांनी दिली या वेळी या मातेच्या कन्यारत्नाला संस्थे च्या वतीने कन्या रत्नासाठी फ्रॉक , आईला पीस , वडिलाला दुपटा , पुष्प गुच्छ व पेडा  देऊन सन्मान करण्यात आला. या मातेने संस्थेचा ‘‘स्वागत स्त्री जन्माचे’’ हा उपक्रम पाहून आनद व्यक्त केला व आभार मानले. या वेळी जिव्हाळा संस्थे च्या सल्लागार संगीता अतुल मादावार  यांनी असे सांगितले कि जिव्हाळा संस्थे चा ‘‘स्वागत स्त्री जन्माचे’’ हा उपक्रम संस्था यवतमाळ जिल्ह्यात सात वर्षा पासून सातत्याने राबिवीत असून आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती यांच्या जयंती चे औचित्य साधून 773 व्या कन्यारत्न व तिच्या माता पित्याचे योथोचीत स्वागत सन्मान जिव्हाळा संस्थे च्या वतीने करण्यात आले. संस्थे च्या संगीता अतुल मादावार व उमरखेड येथील  सहा. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमेधा राठोड यांच्या हस्ते कन्यारत्नला फ्रॉक तिच्या आईला ब्लाउज़ पीस वडिलांना शेला, पेडा व पुष्प गुच्छ देऊन उमरखेड तालुक्यातील मौजे पिंपळदरी येथील जन्माला आलेली कन्यारत्न व आई अल्का जीवन बुरकुले या मातेचे व वडील जीवन बुरकूले यांचे स्वागत करून राजमाता जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद जयंती जयंती साजरी करून अभिवादन करणायत आले. या प्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. आर. एम. मांडण, वैद्यकीय अधिकारी डॉ. के. राठोड, अधिपरीचारीका आर. डी. भताने, अधिपरीचारीका पी. चांदेकर, अधिपरीचारक एम. एस. जोरगेवार, अधिपरीचारीका व्ही. वणवे, अधिपरीचारीका वैष्णवी मुके, क्ष-किरण तंत्रज्ञ सीमा देशमुख, एएनएम. ठाकरे, कल्पना विरूळकर जिव्हाळा संस्थे चे अध्यक्ष अतुल लता राम मादावार उत्तम वानखेडे, श्रीकांत शहा, रोहित अलमुलवार उपस्थित होते.  

“स्वागत स्त्री जन्माचे” हा जिव्हाळा संस्थे चा अनोखा उपक्रम संस्था मागील सात वर्षा पासून अविरत करत आहे उपक्रमा अंतर्गत आज पर्यंत 773 कान्यारत्नांचे व त्यांच्या माता पित्यांचे स्वागत सन्मान करण्यात आले आहे या मागील संस्थे चा मुख्य उद्देश समाजातील स्त्री भृण  हत्या थांबविने, मुलींचाजन्म दर वाढविणे, माता पित्यांमध्ये मुलींच्या आरोग्य व शिक्षणा विषयी  जाणीवजागृती निर्माण करून मुलगा मुलगी समान हि भावना वाढविणे हा आहे.

जिल्हा प्रतिनिधी राजेश ढोले

Post a Comment

0 Comments