Ticker

6/recent/ticker-posts

माहिती विभागाचे कार्य कौतुकास्पद!

कोरोना विरुद्धची लढाई!
Dgipr Mumbai News
सदर संपादकीय यापूर्वीच १ एप्रिल २०२० च्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे.
         सध्या जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. जगातील दीडशेहून अधिक देशांना या व्हायरसने आपल्या विळख्यात घेतले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे. भारतातही हा व्हायरस आता तिस:या टप्प्याच्या उंबरठ्यावर मोठ्या प्रमाणात हातपाय पसरू लागला आहे. केंद्र सरकारने कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केले आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच आढळले आहेत. त्यातच आता बुलडाणा शहरातही कोरोण रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या भयंकर संकटाचा सामना प्रशासनाला करावा लागत आहे. त्यातच बेशिस्त नागरिकांचा मनस्तापही सहन करावा लागत आहेत. पोलिस बांधवही आता अवाहन करुन, समजावून सांगून, दंडुक्याने लाल करुन कंटाळले आहेत, असेच चित्र दिसायला लागले आहे. त्यामुळे आतातरी आपण सर्व जनतेने या गंभिर परिस्थीतीचा विचार करुन, स्वत:ला घरात ठेवून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.
            आज या कोरोना विरुद्ध एकप्रकारे लढाईच सुरु आहे. आणि त्यावर केंद्र सरकार व राज्य सरकार  काटेकोर नजर ठेवून आहेत. यामध्ये प्रत्यक्ष जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्स, कर्मचारी, यांच्यासह संपूर्ण पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालये, मनपा, आरोग्य अधिकारी आणि त्यांची सर्व टीम काम करीत आहे. महसुल विभागासह जवळपास शासनाचे सर्वच विभाग जमेल ते कार्य यावेळी करीत आहेत आणि जनतेला व देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी आघाडी घेत आहेत. या सर्वांमध्ये एक विभाग आज कार्यरत आहे, आणि त्या विभागाला मात्र तारेवरची कसरत करीत काम करावे लागत आहे. तो विभाग म्हणजे 'महिती व जनसंपर्क विभागÓ होय. या विभागाचे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणा:या जिल्हा माहिती कार्यालयांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे, असे म्हटले तर अतिशोक्ती ठरणार नाही.  अनेक ठिकाणी  जिल्हा माहिती अधिकारी पदं रिक्त आहेत. माहिती सहाय्यक  यांनाचा सर्व डोलारा सांभाळावा लागत आहे. त्यातही कर्मचारी संख्या पुरेशी नाही. अशा परिस्थितीतही हा विभाग मात्र आज या कोरोना विरुद्ध ठामपणे आपले कार्य करीत आहे, हे कौतुकास्पदच आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर नागरिकांना द्यावयाच्या अत्यावश्यक सेवा- सुविधांवर लक्ष ठेवून या माहितीचे काटेकोर संकलन आणि  प्रसारण हा विभाग करीत आहे.  आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य यंत्रणा, रक्ताची उपलब्धता, औषधे, पुरवठा विभाग, साठेबाजीची प्रकरणं, खासगी डॉक्टर्सचे दवाखाने, जिल्हा पोलिस दलाशी समन्वय,  मंत्रालयाशी समन्वय, आपत्ती व्यवस्थापन कक्ष,  जीवनावश्यक वस्तू, किराणा माल, भाजीपाला, पेट्रोल-डिझेल वितरण, गॅस सिलिंडर उपलब्धता, शिवभोजन योजना  यासोबतच इतर सर्व सेवांची काटेकोर माहिती संकलीत करुन ती माध्यमांना पोहोचविणे, सरकारकडे पोहोचविणे व सर्व माहिती मिनीटा-मिनीटाला अद्ययावत ठेवणे हे मोठे जिकीरीचे कार्य माहिती कार्यालयांना करावे लागत आहे. वेळोवेळी येणा:या मंत्रालयातील सूचना, आदेश, मा. जिल्हाधिका:यांचे आदेश, आरोग्य विभागाचे आदेश यावरही लक्ष ठेवावे लागत आहे. यामध्ये आता जवळपास सर्वच माध्यमांनी 'वर्क फॉम होम सुरु केल्याने माहिती प्रसारणाची जबाबदारी या विभागाची मोठ्या प्रमाणात वाढली आहे. माध्यमांशी समन्वय राखून जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांची माहिती काटेकोरपणे आता माध्यमांना द्यावी लागत आहे. प्रसिद्धीबाबत व्यापक प्रमाणात उपाययोजना कराव्या लागत आहेत. 
            कोरोनाच्या 'सोशल भीतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना जगण्याची आणि कोणत्याही कारणाने आपल्यालाही कोरोना होऊ शकेल अशी प्रचंड भीती निर्माण झाली आहे. समाजमाध्यमांमधून अजूनही कोरोनाच्या प्रसाराला आळा बसत नाही, आपल्याकडे असलेली माहिती अधिकाधिक जणांकडे पोहोचवण्याची जणू चढाओढ सुरू झाली आहे, यावरही आता ख:या अर्थाने माहिती विभागाला लक्ष देणे आवश्यक आहे. व असे काही आढळल्यास त्याला आवर घालणेही आवश्यक आहे. कारण आता सर्वाच्या मानसिकतेत एकप्रकारे बदल कारावा लागणार आहे. कोरोनाची दहशत कमी करुन, त्याविरुद्ध लढण्यासाठी सर्वांना घरातच बसविणे आवश्यक आहे.
             कोरोना सारख्या या भयंकर विषाणूंवर मात करण्यासाठी सकस आहार, आरोग्यविषयक काळजी, योग्य झोप, रोजचा व्यायाम, शुद्ध हवेत चालणे, चांगले तेच खाणे,  रोगप्रतिकार क्षमता वाढविणे आदी नियम विनासायास पाळले, तर कोणत्याच प्रकारचे विषाणू मानवाचे आयुष्य पोखरू शकत नाहीत, हा विचारही माहिती विभाग आता सामाजिक माध्यमांसह वेगवेगळ्या पद्धतीने जनमानसात पोहोचवित आहे. त्यामुळे एकंदरच शासनाच्या सर्व विभागांसह माहिती विभागाचे कार्यही या गंभीर परिस्थीतीत कौतुकास्पद आहे. 
संजय भ. निकस.  

*****

Post a Comment

0 Comments