Ticker

6/recent/ticker-posts

शालिग्राम वाघ - काळ्या मातीच्या अन् मातीतील माणसांच्या हितासाठी आयुष्य वाहिलेले व्यक्तिमत्त्व!

 shaligram wagh

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आयुष्यभर वाटचाल करणारे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारशिव येथील प्रगतशील शेतकरी रामभाऊ लक्ष्मण वाघ. आयुष्यभर जीवन जगत असताना समाजकारणासाठी तळमळणारे व्यक्तिमत्त्व. स्वत: निरक्षर असूनही आपल्या सर्व मुलांना साक्षरतेचे धडे देऊन, शाळा-महाविद्यालयांमध्ये पाठवून उच्च पातळीवर नेऊन ठेवणारे, मोठ्या हुद्यावर बसविणारे शेती आणि मातीशी नाळ जुळलेले हाडाचे शेतकरी म्हणजेच रामभाऊ! आज जवळपास वयाची नव्वदी पार केली तरीही शेतीसाठीचा ताठ बाणा आणि समाजहीतासाठीची तळमळ मात्र कायमच आहे. अशा या रामभाऊ लक्ष्मण वाघ यांचे सुपुत्र शालिग्राम रामभाऊ वाघ.

म्हणजेच जाफ्राबादचे तत्कालीन तालुका कृषी अधिकारी वाघसाहेब, व अलिकडच्या काळातील स्व. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प योजना म्हणजेच पोकराचे जालना जिल्हा समन्वयक असलेले वाघसाहेब! वडिलोपार्जित मिळालेला शेतीवारसा आणि शेतीनिष्ठा आयुष्यभर जोपासून एका उच्च पदावर पोहोचल्यावरही शेती आणि मातीशी कायम नातं टिकविणारे व्यक्तिमत्त्व! असा हा हाडाचा शेतकरी, सदैव शेतकरी हितासाठी झटणारा उच्चपदस्थ अधिकारी, पाच भावंडांचा सांभाळ करणारा भाऊ, तीनं लेकरांचा जन्मदाता, चिल्यापिल्यांचा काका, मामा अशा अनेक नात्यांच्या पदरात विणल्या गेलेला हळव्या मनांचा भला माणूस.


बहुजन समाजातील विद्याथ्र्यांसाठी, शेतकरी-शेतमजुरांसाठी व सर्वांसाठीच अहोरात्र तळमळ करणारे, सदैव झटणारे समाजकारणी व्यक्तीमत्त्व. अशा या बहुआयामी माणसाचा कदाचीत काळालाही लळा लागावा. आणि त्या काळाने या माणसाला उचलून न्यावे, असे हे आमच्या सर्वांचे 'वाघसाहेबÓ २२ ऑगस्ट २०२० ला आपल्यातून निघून गेले, काळाच्या पडद्याआड झाले. २२ जुलैच्या मध्यरात्री तीव्र हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटनाच मुळात त्यांना ओळखणा:या सर्व शेतकरी बांधव, नातेवाईक, मित्रमंडळी व सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारी अशीच आहे. मृत्यूची खबर कळावी आणि सर्व त्यांच्या जाणत्यांच्या तोंडातील घास खाली पडावा, एवढे प्रचंड प्रेम, स्नेह ते सदैव सर्वांवरती करीत आलेले वाघसाहेब आपल्यातून अगदी चालता बोलता निघून गेलेत.  एक हाडाचा शेतकरी आणि शेतीसाठी झटणारा अधिकारी आपल्यातून निघून गेला ही जणू संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडावासियांसाठी कधीही न भरुन निघणारी हाणी आहे. आपल्या कार्य-कर्तुत्वाने शेतीला आणि शेतक:यांना जणू संजीवनी देण्यासाठी त्यांनी नव-नवीन प्रयोग आयुष्यभर केलेत. आयुष्यभर शेतक:यांसाठी आणि शेतीसाठी झटत राहिलेत.

३ मार्च १९५९ ला रामभाऊ लक्ष्मण वाघ व  सौ. कलावतीबाई रामभाऊ वाघ या माता पित्याच्या पोटी वाघसाहेबांचा जन्म झाला. अत्यंत साधारण परिस्थिती त्यांनी त्यांनी मोठ्या जिद्द आणि चिकाटीने शिक्षण घ्यायला सुरुवात केली. वडिलांच्या मार्गदर्शनात आणि खंबीर अशा साथीमुळे त्यांनी त्या काळामध्ये बी. एस. सी. अॅग्री म्हणजेच 'शेतीतज्ज्ञÓ ही डिग्री पूर्ण केली. शेती विषयातील शिक्षण पूर्ण झाल्यावर १९८३ ला सोलापूरमध्ये कृषि सेवक म्हणून त्यांनी नोकरीची सुरुवात केली. सरकारी नोकरी लागली म्हटल्यावर घरच्यांनी दोनाचे चार हात करण्याची म्हणजेच लग्न करण्याची तयारी सुरू केली. १९८५ ला मलकापूर पांगरा येथील गुलाबराव अंभोरे यांच्या सुकन्या शोभाताई यांच्यासोबत मंगल परिणय संपन्न झाला. विवाह झाल्यानंतर त्यांनी केवळ आपल्या वैवाहिक जीवनात, आपल्या वैयक्तिक जीवनातच लक्ष दिले नाही तर संपूर्ण बहुजन समाजाच्या, संपूर्ण व्यवस्थेच्या व्यापक जनहितासाठी आपल्या शासकीय कामकाजाच्या माध्यमातून मेहनत घेतली.  शेतीमधून अधिकाधिक उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने, शेतीव्यावसायाला फायदेशीर चालना देण्यासाठी नवीन नवीन प्रयोग शेतक-यांसमोर सादर केले. शेतीतून मिळणारे उत्पन्न अधिकाधिक कसे मिळेल यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी आपल्या कार्यकाळात राबविले. शेतकरी हा कायम आर्थिक अडचणींचा सामना करीत असतो, त्यामुळे शेतीसोबत त्याने जर काही पूरक व्यवसाय केला तर नक्कीच उत्पन्नाला जास्तीचा हातभार लागू शकतो, हे त्यांनी शेतक-यांना पटवून दिले.

शेतक:यांना जोड धंदा करण्यास त्यांनी प्रेरित केले. जोडधंद्यासाठीचे पूर्ण मार्गदर्शन त्यांनी नेममीच अगदी शेवटच्या घटकेपर्यंत केले, आणि करीत राहीले. बहुजन समाजातील शिकणा-या मुलांना वेळोवेळी त्यांनी जमेल त्या पद्धतीने आर्थिक, सामाजिक व सर्व बाजूने मदत करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला. पुढे त्यांना दोन मुली व एक मुलगा अशी एकूण तीन अपत्य झाली. दोन्ही मुलींचे विवाह संपन्न घराण्यांमध्ये त्यांनी लावून दिले तर मुलाचे कृषीमध्ये बीएससीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे मुलाने एमबीए शिकायला सुरुवात केली. मुळात हेतू हाच की आपल्या मुलानेही शेतीची व शेतीशी निगडीत सामान्य शेतक:यांची, मजुरांची सेवा करावी या उद्देशाने त्यांनी मुलाला कृषी विषयात पदवी घ्यायला लावली होती. शेती अधिकाधिक फायद्याची कशी होईल, शेतीचे आर्थिक व्यवस्थापन कसे साधल्या जाईल आणि हे सर्व कार्य आपल्या मुलानेही समोर चालू ठेवावे यासाठी त्याला नंतर व्यवस्थापनाच्या दृष्टीने एमबीए या अभ्यासक्रमाला प्रवेशीत केले. हे सर्व करीत असतांना आपल्या लहान भावांनाही त्यांनी शिक्षण आणि शिक्षणाचे धडे दिले. त्यांचे संगोपन केले. त्यांच्या शासकीय कामकाजातील कार्यपद्धतीवर अत्यंत अभिनंदनीय शेरे येत गेल्याने, कामाचे शासनदरबारी कौतुक झाल्याने पुढे त्यांची कृषी सेवक या पदावरून बढती झाली. नंतर ते सोलापूूरवरुन औरंगाबाद, जालना, भोकरदन  आणि शेवटी जाफ्राबाद येथे तालुका कृषी अधिकारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत राहीले.

जाफ्राबाद येथे तालुका कृषी अधिकारी या पदावरून २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर शासनाने त्यांच्या कामकाजाची पद्धत पाहून, शेती आणि माती विषयीची निष्ठा पाहून, जाण आणि भान लक्षात घेऊन त्यांना स्व. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प योजना (पोकरा) या शासनाच्या प्रकल्पामध्ये जालना जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्त केले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांची शेतीची सेवा केली. हजारो शेतक-यांच्या हितासाठी त्यांनी पोखराच्या (स्व. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प योजना) जिल्हा समन्वयक  पदी काम करायला सुरुवात केली.  


त्यांच्या मृत्युसमयीसुद्धा ते पोखरामध्ये काम करीत होते. त्यांनी आपल्या शिक्षणासोबत आपल्या नोकरी सोबत त्यांच्यापेक्षा मोठ्या असलेल्या बहिणबाई सुमनबाई यांचा विवाह वडील रामभाऊ वाघ यांच्या आशीर्वादाने अगदी जणू मोठ्या भावाच्या भुमीकेने टाकरखेड मुसलमान येथील बळीराम जाधव यांच्याशी लावून दिला. त्यांच्यापेक्षा मोठ्या असलेल्या सुमनबाई जाधवांच्या सधन कुटूंबात नांदत्या झाल्या. आणि वाघसाहेबांच्या मायेच्या आशीर्वादाने  जाधव घराण्यात सारशीवच्या वाघ घराण्याचे नाव केले. वाघसाहेबांपेक्षा लहान असलेल्या शोभाताई म्हणजेच रामभाऊ वाघांचे तिसरे आपत्य. त्यांचाही विवाह अगदी मोठ्या थाटात चिखली तालुक्यातील चांधई येथील प्रभाकरराव बनकर यांच्याशी लावून दिला व वाघांच्या शोभाताई, सौ. शोभाताई प्रभाकरराव बनकर झाल्यात. शोभाताईंनाही वाघसाहेबांचे सदैव प्रेम, स्नेह मिळत राहीला. अगदी मोठा भाऊ नव्हे तर जणू आपला बापच आपल्याला शिकवीतो, आपले लाड, सणवार करतो, अशीच भावाना आजही शोभाताईंची वाघसाहेबांविषयी आहे. पण शोभाताईंचा शालीग्रामदादा आज त्यांना दिसणार नाही, हे दुर्देव आहे. करावा तेवढा शोक कमीच आहे. बहीण भावाच्या नात्यातील कधीही न भरुन निघणारी ही फार मोठी हाणी आहे. वाघसाहेबांनी चार नंबरच्या भावाला म्हणजेच उद्धव रामभाऊ वाघ यांना शेतीची आवड असल्याने त्यांना दहावीपर्यंत शिक्षण देऊन अत्यंत प्रगत अशी शेती कशी करता येईल याचे सर्देव मार्गदर्शन करीत राहीले. 

shaligram wagh in farm


वाघसाहेबांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा केवळ नोकरी परिसरातील गावेच नाही, तर सारशिव सह पंचक्रोशीतील सर्वच शेतकरी बांधव लाभ घेत राहीले. त्यांच्या अनुभवी सल्याने आपल्या शेतीला पिकवीत राहीले. उद्धवराव आज  एक उत्कृष्ट शेतकरी, प्रयोगशील कास्तकार म्हणून नावारूपास आले आहेत. त्यांना वेळोवेळी सहकार्य करून, शेतीची एकनिष्ठेने कशी सेवा करावी याचे मार्गदर्शन वाघसाहेबांनी आयुष्यभर केले. पाचव्या नंबरचे भाऊ विजयराव यांना त्यांनी परीपूर्ण मार्गदर्शन करीत एम. ए. बी. एड. पर्यंत शिकविले. त्यानंतर त्यांना पत्रकारितेतील बी.जे. ही पदवी सुद्धा आग्रहाने घ्यायला लावली. आज उच्चविद्याविभूषीत विजय रामभाऊ वाघ सन्मानाने आपले जीवन जगत आहेत. समाजाच्या हीतासाठी झटण्याची वाघसाहेबांची शिकवण कायम स्मरणात ठेवून वाटचाल करीत आहेत. शिक्षणाचा बाबासाहेबांचा आग्रह, भगवान गौतम बुद्धांची शिकवण व आचार-विचार कायम लक्षात ठेवून आपला भाऊ म्हणजेच वाघसाहेबांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत आपल्या कार्यक्षेत्रात लोणार येथे कार्यरत आहेत.

रामभाऊ वाघांचे शेवटचे आपत्य आणि वाघसाहेबांचे लाडके आणि सर्वात लहाने भाऊ  म्हणजेच पत्रकार रविभाऊ. जेष्ठ पत्रकार, तज्ज्ञ संपादक व कायम समाजातील अत्याचाराच्या विरोधात कोणत्याही अमिषाला बळी न पडता आवाज उठविणारा हाडाचा पत्रकार म्हणजेच रविंद्र रामभाऊ वाघ. रविभाऊंचा स्वभाव धडपड्या. काहीतरी वेगळे करण्याची कायम मनात खुमखुमी. कोणत्याही संकटाला न जुमानता वाट निर्माण करणारा निडर माणूस. या सर्व गोष्टी वाघसाहेबांच्या अगदी रविभाऊ लहान असतानाच म्हणजेच 'रवीÓ असतांनाच लक्षात आलेल्या. त्यामुळे त्यांनी रविभाऊंना बीए. पूर्ण झाल्यावर औरंगाबादला पाठवून पत्रकारीतेतील बी.जे. ही सन्मानाची, ज्ञानाची पदवी घ्यायला लावली. आणि नंतर रविभाऊंनीही घेतलेल्या शिक्षणाचे सोने केले. वाघसाहेबांच्या मायेच्या सावलीत आपल्या पत्रकारितेच्या कक्षा प्रगल्भ केल्यात. साहेबांची शिकवण लक्षात ठेवून समाजाच्या हीतासाठी आपली लेखणी झिजवीत आहेत. पत्रकारीता करीत असतांना सर्व पत्रकारांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पत्रकार संघटनांमध्ये नेतृत्व करीत आहेत. बाणेदारपणे संघटना बुलडाणा जिल्ह्यात चालवीत आहेत. अनेक नवोदित पत्रकारांना मोठा पाठिंबा देत आहेत.

एकूणच वाघसाहेबांच्या आशीर्वादाने आज रविभाऊ आयुुष्यात मार्गक्रमन करीत आहेत. यासोबतच त्यांनी आपले हक्काचे स्वतंत्र व्यासपीठ असावे या हेतून साप्ताहिक अखंडझेपची मुहूर्तमेढ रोवली आणि पहाता-पहात अखंडझेप आज जिल्हाभरातील जनसामान्यांच्या प्रश्रांना घेऊन शासनदरबारी झेप घेत आहे, लोकप्रिय होत आहे, हे विशेष! आणखी येथे उल्लेखणीय म्हणजे रविभाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि वाघसाहेबांच्या मार्गदर्शनात सारशिव ग्रामवासियांनी सरपंच पदाची माळही वाघ घराण्याकडे दिली आणि रविभाऊंच्या पत्नी सौ. रंजनाताई वाघ आज सारशिव ग्रामपंचायतची धुरा हाकीत आहेत. ग्राम वासियांच्या विकासासाठी, सदैव प्रयत्न करीत आहेत. आपल्या मोठ्या बहिणीसह म्हणजेच सुमनबाईसह बाकी चारही भावंडांना त्यांनी सदैव प्रेम देऊन, सहकार्य, मार्गदर्शन करुन समाजासाठी आपला वेळ, समाजासाठी आपले कार्य कसे असावे याचे मार्गदर्शन करीत राहिले. एकूणच वाघसाहेबांचे विकासधोरणी कार्य पाहता सारशिव मधील एक रत्न हरवले, अशीच भावना आता सारशिवसह संपूर्ण बुलढाणा जिल्हावासिय करीत आहेत.


shaligram wagh with satyapal maharaj

बहुजन समाजाची आर्थिक स्थिती आजपर्यत बेताचीच राहिलेली आहे. बहुजन समाजातील विद्याथ्र्यांना उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास ब-याच अडचणी येतात, हे वेळोवेळी अनेक प्रसंगांवरून आपल्या लक्षात येते. अशा आर्थिक बेताचीच परिस्थिती असलेल्या शेकडो विद्याथ्र्यांच्या पाठीमागे वाघसाहेब वेळोवेळी मजबूतपणे उभे राहिले. हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे समाजकार्य आपल्याला म्हणता येईल. मुलांनी शिकले पाहिजे, शिकून मोठं झालं पाहिजे, मोठ्या हुद्द्यांवर गेलं पाहिजे हा बाबासाहेबांनी सांगितलेला विचार त्यांनी वेळोवेळी आपल्या आचार आणि विचारातून समाजासमोर यशस्वीरित्या मांडला आहे. जर तुम्ही शिकलात, शिकून-सवरून मोठा झालात, तुम्हाला नोकरी लागली तर तुमच्या येणा-या पिढ्या ह्या एका चांगल्या मार्गाने जीवन जगतील. संपूर्ण समाजव्यवस्थेमध्ये एक मानाचे स्थान निर्माण करतील. हा थोरामोठ्यांचा विचार त्यांनी कायम ग्रामीण भागातील, शहरी  भागातील विद्याथ्र्यांना सांगण्याचा प्रयत्न आयुष्यभर केला.  आपली शासकीय नोकरी ही कायम कृषी विभागाशी आधारित असल्याने, शेती आणि मातीशी आधारित असल्याने, त्यांनी शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करण्याचा सकारात्मक प्रयत्न केला.

यामध्ये विशेष म्हणजे शेतकरी नेहमी आपल्या शेतामध्ये रासायनिक औषधांची फवारणी करीत असतो. जीव-जंतूंपासून पिकाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठी तो आपल्या शेतामध्ये महागडे आणि प्रचंड विषारी असणारे औषधे फवारतो. जरी शेतकरी जीव-जंतुंना मारण्याचा प्रयत्न करतो; परंतु त्या वेळी अनेक वेळा शेकडो कास्तकारांना त्या विषारी औषधांची बाधा होते. कित्येक वेळा तर शेतकरी मृत्युमुखी सुद्धा पडतात. या भयंकर परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने सुद्धा शेतक-यांना अनेक उपाययोजना सांगितल्या आहेत; परंतु ह्या उपायोजना कदाचीत महागड्या असल्याने किंवा इतर काराणांनी प्रत्येक शेतकरी या सर्व सूचनांचे पालन करून फवारणी करेलच असे नाही. हे वाघसाहेबांनी लक्षात घेतले आणि शेवटी प्रचंड विचार करून अत्यंत साध्या पद्धतीने केवळ, फक्त १० रुपये खर्च येत असलेली फवारणी संरक्षण किट स्वत: घरच्या घरी निर्माण करण्याचा प्रयोग केला.  आणि तो पूर्णपणे यशस्वीही झाला. यामध्ये त्यांनी केवळ रासायनिक खतांची दहा रुपये किंमतीची साधी गोणी असते ती दोन बाजूंनी कलात्मक पद्धतीने कापून, व्यवस्थित तिला आकार देऊन संरक्षण कीट म्हणून तयार केली. ही कीट जर आपण शरीरावर घातली तर आपल्याला जवळपास औषधांची बाधा होत नाही. हे त्यांनी प्रयोगातून शेतक-यांना दाखवून दिलं आणि आज हजारो शेतकरी अशा प्रकारच्या किट घरच्या घरी दहा रुपये खर्चामध्ये तयार करून संरक्षित फवारणी शेतमध्ये करीत आहेत. 

 वाघसाहेबांनी नोकरी करीत असताना विविध वनौषधींचे संवर्धन व जतन कसे करता येईल यासाठी कायम प्रयत्न केले आहेत. केवळ राज्यातीलच नव्हे तर परराज्यातीलही कृषी विद्यापीठांना भेटी देऊन तेथील वनौषधी उद्यानाची वनौषधी नर्सरींचा अभ्यास करून ती झाडे अगदी आपल्या शेतात बांधावर कशी लावता येतील यासाठी त्यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. जर आपल्या शेतावर, बांधावर किंवा घराच्या अंगणात एखादं वनौषधीचे झाड असेल तर त्याचा संपूर्ण गावाला फायदा होतो हे त्यांनी वेळोवेळी आपल्या कृतीतून समाजाला आणि संपूर्ण समाजव्यवस्थेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये ते यशस्वी सुद्धा झालेत. एकूणच आर्थिक परिस्थिती हलाखीची असणारा शेतकरी वर्ग कसा पुढे जाईल, शेतकरी आपल्या शेतीसोबत विविध जोडधंदे कशाप्रकारे करेल, त्यातून त्याला जास्तीत जास्त उत्पन्न कशाप्रकारे घेता येईल हा विचार करून त्यांनी आपल्या शिक्षणाचा आपल्या बुद्धीचा आपल्या एकूण अनुभवाचा शेतकरी आणि शेतमजुरांसाठी अहोरात्र विचार करून खूप काही चांगले करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी नोकरी सांभाळत उरलेला अमुल्य वेळ दिला, हे विशेष!  

आजकाल अनेक शेतक-यांच्या जमिनी ह्या खडकाळ आहेत, मुरमाड आहेत. त्यामध्ये जास्त पाऊस असला तरच उत्पन्न मिळते. आणि पाण्याचा हा लहरीपणा या शेतक-यांसाठी कायमच मारक ठरत आलेला आहे. त्यामुळे अशा खडकाळ जमीन असणा-या शेतक-यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. खडकाळ जमीलधारक आर्थिक अडचणीत सापडतात. कर्जबाजारी होतात. आणि मग त्या कर्जबाजारीपणातून हतबलं झालेले अनेक जण मृत्यूलासुद्धा कवटाळतात. गळ्याला गळफास लावतात, हे भयानक वास्तव महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे अशा खडकाळ जमीन असणा-या शेतक-यांना त्यांनी प्रबोधन करून, त्यांच्या विचारांमध्ये बदल करून त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने शेवगा पिकाचे प्रशिक्षण दिले. जर आपण खडकाळ जमिनीमध्ये शेवगा लावला तर आपल्याला प्रचंड उत्पन्न होऊ शकते हे त्यांनी विविध प्रयोगांमधून शेतक-यांसमोर एक जिवंत उदाहरण ठेवले.

त्यांच्या मार्गदर्शनात शेवगा पिकाची लागवड करुन आज शेकडो शेतकरी खडकाळ जमिनीत सुद्धा लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. हे म्हणजे वाघसाहेबांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ६१ वर्षे वयोमान लाभलेले शालिग्राम रामभाऊ वाघ साहेब यांनी आज अनेक असे शेतकरी घडविले आहेत, की आजही शेतकरी बोलतांना सांगतात की केवळ आमची ही परिस्थिती जर बदली असेल, आमची पीक पद्धती बदलली असेल, आमचे उत्पन्न वाढले असेल, तर यामागे केवळ आणि केवळ वाघ साहेबांचेच मार्गदर्शन आहे. असं आज रोजी शेकडो शेतकरी त्यांच्या माघारी जणू त्यांच्या कार्याची पावती देत बोलत आहेत. आणि ज्या वेळेस त्यांच्या जाण्याची बातमी कळाली, त्यांच्या निधनाची वार्ता आली त्यावेळेस शेकडो शेतक-यांनी नव्हे तर हजारो शेतक-यांनी अगदी आपला एखादा मुलगा गेला, आपला भाऊ गेला, आपला वडीलधारा गेला आहे, असे समजून  नक्कीच डोळ्यातून अश्रु गाळले आहेत. आज हजारो डोळ्यांच्या कडा त्यांच्या जाण्याने ओलावल्या आहेत. अशा या बहुआयामी व्यक्तीमत्वाला, जरी शासकीय अधिकारी असले तरी शेती आणि मातीसाठी अहोरात्र झटणा-या नेतृत्वाला कर्तुत्वाला विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली!!!

संजय निकस पाटील

Post a Comment

0 Comments