Ticker

6/recent/ticker-posts

कवी विलास ठोसर यांची कविता बालभारतीच्या " किशोर " मासिकात प्रकाशित...

 



  अकोट येथील आदरणीय जेष्ठ कवी, कथाकार विलास ठोसर यांची कविता येतील पुन्हा ती ' पाखरे '...बालभारतीचे किशोर मासिकात जून २०२५ अंकाच्या मुखपृष्ठाच्या अंतरंग पहिल्या पानावर प्रकाशित झाली आहे. ही आनंददायी व अभिमानास्पद बाब आहे... यातच साहित्य क्षेत्रातील मित्र परिवारा कडून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे...

      विलास ठोसर हे तिसकं वर्षा पासून साहित्यात रूढले आहेत. सातत्याने अनेक वृत्तपत्रातून त्यांचे लेख कविता व कथा प्रकाशित होत असतात..त्यांचा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ अनुदान प्राप्त खोयमोडी कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे व तसेच खंदाळी कविता संग्रह सुध्दा मागिल वर्षी प्रकाशित झालेला आहे...अ. भा. मराठी साहित्य संमेलना सोबतच त्यांचा अनेक साहित्य संमेलन व कविसंमेलनात सहभाग असतो. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन व प्रबोधनात्मक कार्यक्रमातून त्यांचे प्रबोधन कार्यक्रम शाळा कॉलेज व ग्रामीण भागात सुरू असतात...

       कवी विलास ठोसर हे आपल्या कवीतेतून सुमधुर आवाजाने विद्यार्थ्यांनमधे काव्याची, संस्कृतीची आणि सृजनशीलतेची बीजं पेरणारे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या लेखणीची दखल महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या किशोर मासिकाने नुकतीच घेतली तसेच लेखणीचा प्रभाव किशोर वाचकांपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण मित्र परिवार व साहित्य क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे...

Post a Comment

0 Comments